33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र१ जुलैपासून ‘या’ गोष्टी बदलणार...

१ जुलैपासून ‘या’ गोष्टी बदलणार…

टीम लय भारी

मुंबई :- १ जुलै पासून देशात बँकिंग, वाहने या क्षेत्रात बदल होणार. त्याचबरोबर सिलेंडर, दागिने यात ही नवा बदल होणार आहे (This is going to be a new change in cylinders, jewelry).

आता एस बी आय बँक खाते धारकांना महिन्यातून ४ वेळा विनाशुल्क ATM मधून पैसे काढता येणार आहे. एस बी आयच्या बचत खातेदारांना आता १० पानांच्या चेकबुकसाठी ४० रुपये आणि जी एस टी द्यावी लागणार, तर २५ पानांच्या चेकबुकसाठी ७५ रुपये आणि जी एस टी द्यावी लागणार.

दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, आरोपीसोबत रोहित पवारांचा फोटो शेर…

नशिबाने उपजिल्हाधिकारी झाले, पण दुर्दैवाने घरी गेले

सिंडिकेट बँकचे कॅनरा बँकेत विलनीकरण झाल्यामुळे सिंडिकेट बँक खाते धारकांना नव्या आय एफ सी कोडसाठी आपल्या बँकेत जावे लागणार आहे. नवा आयएफसी कोड न घेतल्यास खातेधारकांना एन.ई.एफ.टी., आर.टी.जी.एस., आणि आय.एम.पी.एस या सुविधा मिळणार नाही.

आता सोन्याच्या दागिन्यांसाठी युनिक आयडी मिळणार आहे. त्यामुळे दागिने हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास दागिन्यांची ओळख पटवता येणे शक्य होणार आहे. सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे (The financial budget of housewives has collapsed).

7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी स्वगृही, पण नियुक्ती दुय्यम ठिकाणी

वाहन परवाना काढण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. वाहन परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी होणार आणि चाचणीत उत्तीर्ण झाल्यावर वाहन परवाना थेट घरी येणार आहे. परंतु पर्मनंट परवान्यासाठी ट्रकवर वाहन चालवून दाखवणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मारुती आणि हिरो गाडीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स जर कंपनीनी भरला नसेल तर त्यांना १ जुलैपासून दुप्पट पटीने टी.डी.एस. भरावा लागणार आहे (If the company has not filed the income tax returns, they will have to pay double TDS from July 1. Have to pay).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी