31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजसर्वसामान्य जनतेला फटका, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला

सर्वसामान्य जनतेला फटका, सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला

टीम लय भारी

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद आता भारतात देखील उमटायला सुरूवात झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान 1 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.(general public was hit, the cylinder became expensive)

एलपीजी सिलेंडरचे दर तब्बल 105 रूपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली असून घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलेंडर देखील महाग होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 105 रूपयांनी वाढ करण्यात आल्यानंतर एलपीजी गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत 19 किलोंच्या एलपीजी सिलेंडरसाठी 1857 ऐवजी 1963 रूपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर 2012 रूपयांना मिळणार आहे.

दरम्यान, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झाली नसली तरी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर व कच्च्या तेलाच्या किंमतीत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना मिळाली मोठी सूट

राज्यात लवकरच वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

शेकडो सुरक्षारक्षकांचा प्रलंबित मागण्यांसाठी आज पासून आजाद मैदानात ठिय्या

Amul Increases Price of Milk by Rs 2 Per Litre From Tomorrow. Check New Rates in Metro Cities Here

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी