29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयदगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, आरोपीसोबत रोहित पवारांचा फोटो शेर...

दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, आरोपीसोबत रोहित पवारांचा फोटो शेर…

टीम लय भारी

मुंबई :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली होती. काल रात्रीच्या सुमारास गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर पडळकरांनी दगडफेक केलेला आरोपीसोबत आमदार रोहित पवारांचा फोटो शेर केला आहे (Padalkar became aggressive, shared a photo of Rohit Pawar with the accused).

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा आणि दगड फेक केलेल्या आरोपीसोबतचा फोटो ट्विट केला आहे. यासोबत ते म्हणाले, प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल…घोंगडी बैठका सुरूच राहणार… असे ट्विट गोपीचंद पडळकरांनी केले आहे (This tweet was made by Gopichand Padalkar).

शरद पवार मोठे नेते आहेत, हे मी मानत नाही; गोपीचंद पडळकर

पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर अश्लिल शब्दात टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

Padalkar aggressive photo Rohit Pawar with the accused
गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला करतांना आरोपीने घोषणा दिल्या. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून आरोपीने तिथून पळ काढला. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवर त्याचा पाठलाग केला. परंतु दगडफेक करणारा त्यांच्या हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली.

काल रात्री सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला झाला. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा गोपीचंद पडळकर यांनी घेतला (Pavitra Gopichand Padalkar said I will not sit still even if I am hit by a stone while giving).

राष्ट्रवादीची विरोधी पक्षावर खोचक टीका; तुम्ही फक्त भावनिक मुद्द्यांचे राजकारण करा

Maharashtra BJP Leader Says His Car Was Attacked With Stone In Solapur

Padalkar aggressive photo Rohit Pawar with the accused
रोहित पवार आणि दगडफेक केलेला आरोपी

माध्यमांशी बोलतांना गोपीचंद पडळकर म्हणाले, मी शरद पवारांवर काय टीका केली होती मग मी बोललेले इतके वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?, असा प्रतिप्रश्न गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. बहुजनांना जागे करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे पडळकर म्हणाले (I am trying to wake up the masses, said Padalkar).

यानंतर गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीला धारेवर धरत म्हणाले, माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझे शरद पवारांना आव्हान आहे की, त्यांनी सांगावे, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचे हे कोणत्या कलमात लिहले आहे. असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे (The attack has been done by Gopichand Padalkar).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी