29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रधुळे-सुरत महामार्गावर भरधाव ट्रकला लागली आग

धुळे-सुरत महामार्गावर भरधाव ट्रकला लागली आग

नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात धावत्या ट्रकला आग लागल्याची थरारक घटना बुधवारी घडली. ट्रकला आग लागताच ट्रक चालकाने उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. तरीही आगीमध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा ट्रक चालकाचा अंदाज आहे. हा ट्रक गुजरातमधील वाकाचार रस्ता येथून वाळू भरून नाशिकच्या दिशेने जात असताना ट्रकला आग लागली ट्रकचे कॅबिन लाकडी असल्याने काही वेळातच या ट्रकचे कॅबिन जळुन खाक झाले आहे. या महीन्याभरात वाहनांना आग लागण्याची ही चौथी घटना आहे. तरीही यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी कोंडाईबारी घाटातील निमदर्डा फाट्याजवळील महामार्गावर पावडरणे भरलेल्या चालत्या ट्रकला आग लागली होती. हा ट्रक गांधीधामहून कर्नाटककडे जात होता. या घटनेमध्ये ट्रक जागीच जाळून खाक झाला होता. ट्रक चालकाने वेळीच उडी मारून स्वत:चा जीव वाचवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमध्ये ट्रक जळून खाक झाला होता. या महिन्याभरात कोंडाईबारी घाट परिसरात चौथ्यांदा अशी घटना घडली आहे.

हे सुध्दा वाचा: 

आधी वादळी खेळीनंतर 4 विकेट, अर्शिन कुलकर्णीची उल्लेखनीय कामगिरी

आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांवर ईडीचे छापे

हरीनामच्या गजरात निवृत्तीनाथांच्या पालखीचे सोलापूरकडे मार्गक्रमण, मुक्ताबाईंची पालखी भूम मुक्कामी

महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा हा महत्वाचा मार्ग या महामार्गावर मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. येथे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या घटनांमुळे जिल्हा प्रशासनाला महामार्ग वाहतूक पोलिस मदतकेंद्र चौकी किंवा विसारवाडी ग्रामपंचायत यांकडे अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत. पण जिल्हाप्रशासनाकडून मात्र अग्निशमन बंबाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी