30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रAURANGABAD : दोन कोरोनाग्रस्त कैदी अंथरुणाचा दोर करुन पसार

AURANGABAD : दोन कोरोनाग्रस्त कैदी अंथरुणाचा दोर करुन पसार

टीम लय भारी

औरंगाबाद : दोन करोनाबाधित कैद्दी पोलीस बंदोबस्तातील कोरोना उपचार केंद्रातून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. किलेअर्क परिसरात महापालिकेच्या उभारलेल्या उपचार केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु होता. रुग्णालयातील गादीवरील अंथरुणाचा दोर करुन दोघे पसार झाले. अक्रम खान गयास खान आणि सय्यद सैफ सय्यद असद अशी पळून जाणाऱ्या कैद्यांची नावं आहेत.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक कैलाश काळे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. काळे यांनी तक्रारीत सांगितले की, रुग्णालयातील गादीवरील अंथरुणाचा दोर करुन कैदी पसार झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होता. दोन दिवसापूर्वी कारागृहातील २९ जणांना करोनाची बाधा झाल्याने किलेअर्क परिसरातील करोना उपचार केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

खिकीचे गज वाकवून असे पळाले आरोपी…

किलेअर्क परिसरात महापालिकेच्या उभारलेल्या करोना उपचार केंद्रात सर्व करोनाबाधित कैद्याांवर उपचार सुरू होते. त्या वेळी रविवारी रात्री पहिल्या मजल्यावरील पहारेकरी लघुशंकेला गेला असताना महापालिकेचे कर्मचारी नाडे यांनी दोघांना पळून जात असताना पाहिले. खिडकीचे गज वाकवून बेडशीटची दोरी करुन ते पळाले. अन्य आरोपीवर देखरेख करण्यास सांगून पहरेकऱ्यांनी शोधही घेतला. दिल्ली गेट जवळ ते लपून बसल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही अंधाराचा फायदा घेऊन ते पळाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी