28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्र२० पोलिसांनी ४ वारकऱ्यांना एका खोलीत नेऊन बेदम मारले

२० पोलिसांनी ४ वारकऱ्यांना एका खोलीत नेऊन बेदम मारले

३०० वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्यात गालबोट लागणारा प्रकार रविवारी घडला. इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. मंदिरात प्रवेश करण्यावरुन पोलीस आणि वारकरऱ्यांमध्ये शब्दाची बाचाबाची झाली. त्यावरुन पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला आहे. वारकऱ्यांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी आम्हाला एकांतात नेऊन मारले,जवळपास १५ ते २० पोलिसांनी चार जणांना मारहाण केली. असे व्हायरल व्हिडिओत वारकऱ्यांने सांगितले आहे. विशाल पाटील असे या तरुण वारकऱ्यांचे नाव आहे.पोलिसांनी आम्हाला नेमके का मारले? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी आता या वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये त्याचे शर्ट अनेक ठिकाणी फाटलेले दिसत आहे. तसेच शर्टावर दोन, तीन ठिकाणी रक्ताचे डाग दिसत आहेत.

आम्ही सर्वजण जळगाव जिल्ह्यातून पालखी सोहळ्यासाठी आलो होतो. दरवर्षी आम्हाला मंदिरात दर्शनासाठी जाऊ दिले जाते. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही आम्ही दर्शनासाठी जात होतो. तेव्हा पोलिसांनी आम्हाला अडवले. केवळ याच वर्षी ही बंदी का?, हा एक प्रश्नच आहे. त्यानंतर काही जणांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी लाठीमार केला. माझ्यासह आणखी काही जणांना तर बाजूला एकांतात नेले. त्यानंतर एका खोलीत नेत आम्हाला मारहाण झाली, असा गंभीर आरोप या वारकऱ्याने केला आहे.भविष्यात इतर वारकऱ्यांवर हात उचलू शकतात. पोलिसांनी मारहाण का? केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं. असेही विशाल म्हणाले आहेत.

हे सुध्दा वाचा :

सामन्यादरम्यान अजिंक्य आणि शार्दुलचे मराठीत संभाषण व्हायरल

विठूरायाची वारी झाली डिजिटल; वारी चुकेल्या वारकऱ्यांना आता घरीच मिळणार दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंची निवड; अजित पवारांकडे कोणतीच जबाबदारी नाही

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांवर लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केला आहे. तसेच, चुकीच्या बातम्या पसरवू नये, असे आवाहनही केले आहे. मात्र, मारहाण झालेल्या एका तरुण वारकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी