29 C
Mumbai
Tuesday, September 19, 2023
घरमहाराष्ट्रदलित पॅथरने आम्हाला काय दिले.......

दलित पॅथरने आम्हाला काय दिले…….

भारतात १९७० नंतर शिक्षित तरुणांची एक पिढी पुढे येत होती. तेव्हा रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत वादाने राजकीय वातावरण दुषित झाले होते. दलित अत्याचाराने पराकोटीची सिमा गाठली होती. प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. तेव्हा तरुणांनी पुढाकार घेवून अमेरिकेतील ब्लॅक पॅथरच्या धर्तीवर भारतात विशेषत मुंबईतून कामाठीपूरा येथील सिध्दार्थ नगरमधून एक बुलंद आवाज बाहेर आला. त्याचे नाव होते. दलित पॅंथर …….नामदेव ढसाळ, ज.वि.पवार, राजाभाऊ ढाले, अविनाश महातेकर, भाई संगारे आदी…तरुणांनी १९७८ नंतर मुंबईतील वस्त्या- वस्त्या पिंजून काढल्या….

दलित पॅंथरच्या छावण्या उभ्या राहिल्या. मुंबईत एकजूटीची ही ताकद संपूर्ण भारतभर व्यापून गेली. सहाजिकच या सामाजिक आंदोलनाने देशाचे राजकारण ढवळून गेले. परंतु आंबेडकरी चळवळीला लागलेला फूटीचा आजार बळावला आणि चळवळ विखूरली गेली. त्यानंतर ज्यांना जसा वेळ मिळाला त्यानुसार ही चळवळ सुरु आहे. कार्यरत आहे. परंतु दलित पॅथरने आंबेडकरी चळवळीचा धाक जगासमोर उभा केला.

सहाजिकच त्यामागे प्रेरणा होती, ती महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांची… पॅंथर चळवळीचा जन्म झाला, तेव्हाच माझाही जन्म झाला. परंतु सिध्दार्थ महाविद्यालयात शिकत असताना दलित पॅंथरचे आकर्षण निर्माण झाले. त्यानंतर ज.वि.पवार, राजाभाऊ ढाले,अविनाश महातेकर यांच्याशी संपर्क झाला. चळवळीत कसे लढावे. हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. दलित पॅंथरने आंबेडकरी समाजाला राजकीय सत्ता नाही दिली. परंतु एक व्यापक सर्व समावेशक सामाजिक आंदोलन दिले, उभे राहिले.

या आंदोलानाची तुलना मला अणुबॉम्बशी करावी लागेल.त्यांच्या वैचारिक स्फोटाचे आज आवाज ऐकायला मिळत आहेत.दलित पॅथर शिक्षण,नोक-या आणि स्वाभिमान मिळवून दिला. अन्यायाविरोधात पेटून उठण्याची धमक दिली. अनेकांना सत्तेत संधी दिली. आज जी पिढी उच्च शिक्षणात पुढे आहे, त्याची देण महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर विचारधारेतून निर्माण झालेली दलित पॅंथरचे योगदान आहे. दलित पॅंथरमध्ये हजारो तरुणांचा त्याग, समर्पण आहे. म्हणून अनेक तरुण भेटले की मला सांगतात, माझे वडील, आजोबा पॅंथर होते. काही जण नाराजी व्यक्त करतात. पॅंथर चळवळीत आमचे कुटुंब उध्वस्त झाले,अशी खंत व्यक्त करताना दुःखी होतात आणि चळवळीत आमच्या कुटुंबाचे योगदान आहे, असे सांगून स्वत; गौरवही करुन घेतात.

हे सुद्धा वाचा

…पण डोळ्यांना ते कधी जमलचं नाही; रिंकू राजगुरुच्या शायरीने चाहते घायाळ

बीएमसीकडून मशीन वाटपाच्या कार्यक्रमावर कोट्यवधींचा खर्च; चौकशी करण्याची मागणी

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे निधन

दलित पॅंथर चळवळीनंतर दोन पिढीकडून नवा उद्रेक उभा राहू शकला नाही. कारण सध्याची तरुण पिढी आंबेडकरी चळवळीकडे कृषित नजरेने पहात आहे. त्यामुळे नवे नेतृत्व उभे राहत नसले तरी आंबेडकरी चळवळीत सामूहीक नेतृत्व उभे राहू पहात आहे. हे आपणास भीमा कोरेगावच्या भीमसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर जो महाराष्ट्रात उद्रेक झाला त्यातून पहावयास मिळाले आहे, म्हणून  दलत पॅंथर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना दलित पॅंथर्स यांचे योगदान विसरुन चालणार नाही.. ज्या पॅंथरनी योगदान दिले आहे. त्यांना क्रांतीकारी सलाम……..जय भीम….

(महादू पवार, पत्रकार, मुंबई)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी