32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयमोफत लस देण्याबाबत अद्याप निर्णय नाही, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे वाढला संभ्रम

मोफत लस देण्याबाबत अद्याप निर्णय नाही, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे वाढला संभ्रम

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील 18 ते 45 वयोगटातील लोकांना मोफत ‘कोरोना’ लस दिली जाणार आहे किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतचे ट्विट डिलिट करून पुन्हा नवीन ट्विट केल्यामुळे हा संभ्रम झाला आहे ( Aaditya Thackeray tweeted about Vaccination ).

मोफत लस देण्याबाबत कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रकारांना माहिती दिली होती. त्यानंतर ( Nawab Mallik was announced free vaccination for Maharashtra ). आदित्य ठाकरे यांनीही या आशयाचे ट्विट केले.

काही वेळानंतर मात्र आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट डिलिट केले ( Aaditya Thackeray deleted his tweet about free vaccination ). सुधारित ट्विट करून त्यांनी हा निर्णय अद्याप झाला नसल्याच्या आशयाचे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे ‘कोरोना’ लस मोफत मिळणार किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Aaditya Thackeray deleted his tweet
आदित्य ठाकरे यांनी अगोदर हे ट्विट केले होते, नंतर ते डिलिट केले

सुधारित ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, लोकांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून मी अगोदरचे ट्विट डिलिट केले आहे. लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समितीमार्फत अधिकृतपणे जाहीर केले जाईल ( Aaditya Thackeray’s revised tweet on free vaccination ).

हे सुद्धा वाचा

‘घाबरू नका, मोदीच पुन्हा येणार’; अनुपम खेर यांच्या विधानावर लोकांचा संताप

माजी IAS प्रभाकर देशमुख 2 कोविड सेंटर्स उभारणार

गोंदवलेकर महाराज ट्रस्टने ‘कोरोना’साठी रूग्णालय द्यायलाच हवे, निलम गोऱ्हे यांची भूमिका

Maharashtra To Give Coronavirus Vaccine To All Citizens For Free

अगोदरच्या ट्विटमध्ये ठाकरे यांनी ‘राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत निर्णय घेतल्याचे’ जाहीर केले होते.

दरम्यान, ज्यांना लसीचे शुल्क देणे शक्य आहे, त्यांच्या कडून शुल्क आकारणी व्हायला हवी. जे गरीब लोक आहेत, त्यांना मोफत लस द्यायला हरकत नाही, असे जाहीर विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे ( Ajit Pawar spoke on free vaccination ).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी