29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमंत्रालयमंत्रिमंडळ विस्तार: कदम, शिरसाट, गोगावले, दरेकर, शेलार, लाड यांची नावे चर्चेत

मंत्रिमंडळ विस्तार: कदम, शिरसाट, गोगावले, दरेकर, शेलार, लाड यांची नावे चर्चेत

17 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, त्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. शिवसेनेचे आमदार योगेश रामदास कदम, भरत गोगावले, संजय शिरसाट तसेच भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशीष शेलार यांची तर अजित पवार यांच्या पक्षाच्या दोन आमदारांना मंत्री पदाची लॉटरी लागू शकते.

पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल.शिंदे, फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळ विस्ताराला मुहूर्त कधी लाभेल याची चर्चा होती. विशेष म्हणजे शिंदे गटातील योगेश रामदास कदम, भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू आदी आमदार उतावीळ झाले होते. भाजपकडून आशीष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनाही मंत्री मंडळात यायचे आहे. असे सगळे असताना गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नऊ आमदारांना मंत्री केल्याने शिवसेना आणि भाजपा आमदारांमध्ये नाराजी होती. आता आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का, असा सवाल काही आमदार करत होते.

आमदार मंडळींची नाराजी वाढल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी रात्री नंदनवन या बंगल्यावर बैठक झाली. त्यात दोन्ही कडच्या आमदारांच्या नाराजीची चर्चा तर झाली, शिवाय मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटप यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार हा मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. या बरोबर अजित पवार यांच्या गटातील दोन आमदारांना मंत्री बनवून, मंत्री मंडळ पूर्ण करायचे आहे. सध्या एका मंत्र्याकडे अनेक खाती असल्याने त्यांच्यावर कामाचा ताणही पडतो, शिवाय गुणवत्ता पूर्ण कामेही होण्यास अडचणी येत आहेत.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांना अर्थखाते मिळणार की दुसरे मलाईदार खाते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि शरद पवार येणार एकाच स्टेजवर

मुंडे कुटुंब कोणी फोडले याचे उत्तर अजित पवार यांनी सात वर्षापूर्वीच दिले होते; खरे कोण भुजबळ की पवार

या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक समतोल साधत हा मंत्री मंडळ विस्तार होणार आहे. आमदारांचे उपद्रवमूल्य, जात, अनुभव या सगळ्यांचा विचार करत उर्वरित जिल्ह्यात पालकमंत्री नेमताना राष्ट्रवादी वरचढ होणार नाही याचाही विचार एकनाथ शिंदे यांना करावा लागणार आहे. अजित पवार यांना समजा अर्थमंत्री केले तर ते आपल्या गटाच्या आमदारांना जास्त विकास निधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनाही काबूत ठेवून नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपला मुख्यमंत्री शिंदे यांना खूश ठेवावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी