35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयजास्त फी उकळणाऱ्या खासगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल करणार : दीपक...

जास्त फी उकळणाऱ्या खासगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल करणार : दीपक केसरकर

कोरोना काळात पालकांकडून जास्त फी वसूल करणाऱ्या आणि फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र रोखणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई करण्यासाठी तज्ञांची समिती नेमली जाणार असून या शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल केला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

ते म्हणाले, कोरोना काळात पालकांकडून जास्त फी वसूल करणाऱ्या शाळांविरुद्ध आलेल्या तक्रारींची शहनिशा करण्यासाठी राज्यसरकारने छाननी समिती नेमली होती. या समितीने काही पालकांच्या तक्रारींचे निराकरण केले.

या छाननी समितीकडून पालकांना न्याय मिळाला नसेल तर खासगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
कायद्यात बदल करण्यासाठी लवकरच शिक्षण तज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

या समितीमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, पालक संघटना प्रतिनिधी, पत्रकारांचा समावेश केला जाईल. या समितीच्या सुनावणीत आपण स्वतः उपस्थित राहून खासगी शाळांवर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले.

राज्यातील शाळा १५ जूनला, तर विदर्भातील शाळा ३० जूनला सुरु होणार

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या उन्हाळी सुट्टयांचे योग्य नियोजन करता येण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक वर्षात विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील ऊन लक्षात घेता, तेथील शाळा ३० जून रोजी सुरू केल्या जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

दाभोळकरांच्या हत्येचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली होणार नाही

भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली

Apple सीईओने माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईच्या वडापावचा आस्वाद!

विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, मोजे, वह्या मोफ़त देणार

यदांच्या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्यात येणार आहे. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडा नीट समजण्यासाठी पुस्तकात कोरी पाने ठेवली जाणार आहेत.

बालभारतीच्या पुस्तकाची किंमत कागद महागल्यामुळे ३० टक्क्याने वाढणार असली तरीही ९० टक्के मुलांना मोफत पुस्तके मिळणार असल्याने त्याचा विद्यार्थी व पालकांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी