27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रईडीविरोधातील जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी

ईडीविरोधातील जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी

ईडी काही विशेष लोकांवरच कारवाई करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. अशातच आता ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची एक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने ही याचिका दाखल करुन घेतली असून या याचिकेवर 26 जून रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर 26 जून रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ईडी काही विशेष लोकांवरच कारवाई करत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. असे अनेक आरोपी आहेत ज्यांना ईडीने समन्स पाठविले आहे. काहींना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र नंतर आरोपीवर ईडी जाणूनबुजून कारवाई करत नसल्याचा आरोप देखील या याचिकेतून केला आहे. अॅड. नितीन सातपूते यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

सदर याचिकेवर सुनावणीसाठी अॅड. नितीन सातपुते यांनी आज मुख्याधीशांच्या कोर्टासमोर विनंती केली. त्यानंतर कोर्टाने ईडीविरोधातील या याचिकेवर 26 जून रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

हे सुद्धा वाचा

जास्त फी उकळणाऱ्या खासगी शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात बदल करणार : दीपक केसरकर

दाभोळकरांच्या हत्येचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली होणार नाही

भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली

ईडीच्या तपासावर अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. ईडी केंद्र सरकाच्या तालावर नाचत असून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी ईडी कारवाई करत असल्याचा आरोप देखील विरोधी पक्षांतील नेते करत असतात. अशातच ईडी अधिकाऱ्यांच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली असून कोर्टाने देखील ही याचिका सुनावणीस घेण्यास सहमती दर्शवली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी