30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाIndian Cricket Team : राहुल द्रविडचे मोठे वक्तव्य, भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर...

Indian Cricket Team : राहुल द्रविडचे मोठे वक्तव्य, भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर केले भाष्य

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत असलेल्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) भारताच्या निराशाजनक कामगिरी विषयी विचारले असता ते म्हणाले की, अशा पराभवांचे विश्लेषण करताना आम्ही त्याबद्दल जास्त विचार करून स्वत:च्या क्षमतेबद्दल शंका निर्माण करत नाही. अनेकदा टी-20 सामन्यामध्ये विजय आणि पराभवातील अंतर हे फारच कमी असते. हे विसरून चालणार नाही की दोन्ही सामन्यांमध्ये कठीण‍ परिस्थिती असून सुद्धा आम्ही सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध चांगला लढा दिला.

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) गुरूवारी आपल्या आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2022) अभियानाची सांगता अफगाणिस्तान संघाविरूद्ध 101 धावांनी विजय मिळवून केली. अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली.‍ त्यामुळे भारतीय संघाच्या डावाची सुरूवात विराट कोहली (Virat Kohli) आणि के. एल. राहुल (K.L. Rahul) यांनी केली. दोघांनी अनुक्रमे 122 आणि 62 धावा करून भारतीय डावाला भक्कम सुरूवात करून दिली. बुधवारी पाकिस्ताच्या संघाने अफगाणिस्तानचा ‘सुपर 4’ (Super 4) गटात पराभव केल्याने भारतीय संघाच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तान आणि हॉंगकॉंगच्या संघावर मात करून आशिया कप स्पर्धेतील अभियानाला चांगली सुरुवात केली होती. परंतु ‘सुपर 4’ गटामध्ये भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघाविरूद्ध पराभवाना सामोरे जावे लागले. त्यातच भारताच्या अष्टपैलु खेळाडू रविंद्र जाडेजा जायबंदी झाल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाला संघ निवड करताना अडचणी येत होत्या.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत असलेल्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) भारताच्या निराशाजनक कामगिरी विषयी विचारले असता ते म्हणाले की, अशा पराभवांचे विश्लेषण करताना आम्ही त्याबद्दल जास्त विचार करून स्वत:च्या क्षमतेबद्दल शंका निर्माण करत नाही. अनेकदा टी-20 सामन्यामध्ये विजय आणि पराभवातील अंतर हे फारच कमी असते. हे विसरून चालणार नाही की दोन्ही सामन्यांमध्ये कठीण‍ परिस्थिती असून सुद्धा आम्ही सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध चांगला लढा दिला.

हे सुद्धा वाचा –

Maharashtra Politics : मनसेला मिळणार मंत्रीपद, अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आशा पल्लवित !

Breaking : 12 आमदार नियुक्त्यांचे प्रकरण पुन्हा न्यायालयात, राज्यपालांनी न्यायालयाची बेअदबी केल्याची याचिका!

Maharashtra Politics : ‘भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे’

ते पुढे म्हणाले की, सलग दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवांबद्दल मला कोणतेही कारण देऊन सारवासारव करायची नाही.‍ आम्हाला प्रत्येक सामन्यागणिक स्वत:च्या खेळामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. भारतीय संघ मागील 8-9 महिन्यांपासून नियमितपणे चांगले प्रदर्शन करत आहे. आम्ही सलग दोन सामन्यांमध्ये पराजित झालो असलो तरी आमचा संघ दुबळा नाही असे मी विश्वासाने सांगू शकतो.

द्रविडने असे नमूद केले की, संघात दोन-तीन चांगले खेळाडू जायबंदी झाले तर संघाचा समतोल बिघडतो. टी-20 स्पर्धांमध्ये विजय आणि पराजयातील फरक हा खूपच कमी असतो. शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ जिंकेल याची शाश्वती नसते त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडुला आपले डोकं शांत ठेवून चांगले प्रदर्शन करण्याची गरज असते. आमच्या संघातील खेळाडूंना या गोष्टीची जाण आहे आणि आमच्या ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण आहे त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.

भारत 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. भारत आणिऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना पहिला सामना पंजाबमधील मोहालीमध्ये रंगणार आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी