30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
HomeमुंबईMaharashtra Politics : मनसेला मिळणार मंत्रीपद, अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आशा पल्लवित !

Maharashtra Politics : मनसेला मिळणार मंत्रीपद, अमित ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आशा पल्लवित !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी सुद्धा अनेक ठिकाणी भेटीगाठी केल्या त्यामुळे मनसे सुद्धा भाजप आणि शिंदे गट यांच्या गोटात सामील होऊन महाविकास आघाडीला दणका देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच धर्तीवर अमित ठाकरे यांनी केलेले वक्तव्य म्हणून महत्त्वाचे मानले जात आहे. 

गेले अनेक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे या प्रादेशिक पक्षाचे महत्त्व कमी झाले होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि भाजप या पक्षांना आव्हान देत छोटंस अस्तित्व टिकवत दरवेळी चाल करत मनसेचा पुढे येण्याचा प्रयत्न होता परंतु तसे काही घडले नाही. मनसेची अनेक वर्षे ओळख ही राज ठाकरे आणि त्यांचे दमदार भाषणापुरतीच मर्यादित राहिल्याने हा पक्ष संपुर्ण मागेच पडला असे अनेकजण म्हणू लागले होते, परंतु आताची परिस्थिती काही वेगळंच सांगू लागली आहे. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज आम्ही सत्तेत लवकरच येणार, असे माध्यमांशी केलेले विधान अनेक अर्थानी महत्त्वाचे मानले जात आहे.

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सहभागी झाले. या मोहिमेदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आम्ही सत्तेत लवकरच येणार असे सूचक वक्तव्य केले त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या आधी सुद्धा अमित ठाकरेंना कॅबिनेट पद मिळणार असे म्हटले जात होते परंतु त्यावेळी त्यांनी या चर्चांना विराम देत हे वृत्त खरे नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे अमित ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेच्या अनुषंघाने केलेले विधान कितपत महत्त्वाचे आहे हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अतिरेकी याकूब मेमनच्या नातलगाबरोबर सलगी

Maharashtra Politics : ‘भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे’

Rohit Pawar : रोहित पवारांकडून भाजप नेत्यांना बारामतीचं आवतणं…

मुंबई महापालिकेत यावेळी कोणाचा झेंडा गाडला जाणार यावर चुरस सुरू आहे. प्रत्येकच पक्ष आपापल्या परीने याकामी जोरदार तयारीला लागला आहे. कायम एकहाती सत्ता मिरवणाऱ्या शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे यावेळी महापालिकेत शिवसेना की आणखी कोण असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे. दुसरीकडे भाजपने सुद्धा जोरदार तयारी सुरू केली असून शिंदे गटाला आधीच आपल्यात सामील करून घेत आता मनसेला सुद्धा सामील करून घेण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहेत, त्यामुळे या वेळी भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार आणि ही महायुती निवडणुकीला सामोरी जाणार असे म्हटले जात आहे.

दरम्यान या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपला शिव्या घालत असत. प्रचंड टिकाटिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते धारेवर धरत परिणामी राज ठाकरे यांच्या मागे ईडीची पिडा सुरू झाली. त्यानंतर ठाकरेंचा हा उत्साह गळून पडला आणि ते केवळ हिंदुत्व एके हिंदुत्वावर बोलू लागले. हनुमान चालीसाचा मुद्दा सुद्धा गाजला. भाषणांमध्ये सुद्धा भाजपचे कौतुक करण्यात येऊ लागले आणि संपुर्ण राजकीय रंगच त्यांनी बदलून टाकला.

राज्यात सत्तांतरानंतर अनेक मोठे बदल पाहावयास मिळाले, अनेकांपुढे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित राहिला, तर कुणाला तुपाची पोळीच खायला मिळाली. या संपुर्ण घडामोडींमध्ये दुरून पाहणाऱ्या मनसेला मात्र कमालीचा फायदा झाला. मुंबई महापालिकेच्या विजयाचे लक्ष घेऊन चालणारी भाजप वेगाने चाल करू लागली आहे. सदर खेळात मनसे सुद्धा पुर्ण तयारीनिशी उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी सुद्धा अनेक ठिकाणी भेटीगाठी केल्या त्यामुळे मनसे सुद्धा भाजप आणि शिंदे गट यांच्या गोटात सामील होऊन महाविकास आघाडीला दणका देणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. याच धर्तीवर अमित ठाकरे यांनी केलेले वक्तव्य म्हणून महत्त्वाचे मानले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी