31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयबदल्यांच्या घोडेबाजाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप, फाईल पाठविली परत

बदल्यांच्या घोडेबाजाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप, फाईल पाठविली परत

टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयात सहसचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. त्याला ‘लय भारी’ने वाचला फोडली होती. ‘लय भारी’च्या या बातमीची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या घोडेबाजाराला चाप लावला. बदलीची फाईल मुख्यमंत्र्यांनी परत पाठवली (The transfer file was sent back by the Chief Minister).

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी बदल्यांची फाईल गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविली होती. पण मुख्यमंत्र्यांनी फाईलला मंजुरी दिली नाही. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी ही फाईल परत पाठविल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हवीत ‘मलईदार’ पदे, वशिल्यासाठी पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांचा खच

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांसोबत संधान बांधून गैरप्रकार केले होते. मलईदार पदे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनी मंत्री, आमदार अशा पुढाऱ्यांची शिफारसपत्रे सादर केली होती. महसूल, नगरविकास, पीडब्ल्यूडी अशा खात्यांतील मलईदार पदांसाठी अधिकाऱ्यांनी लॉबिंग केले होते (Officials had lobbied for creamy posts in departments like revenue, urban development PWD).

The transfer file was sent back by the Chief Minister
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मंत्रालयात एकाच खात्यात सहा वर्षे, तर एका पदावर तीन वर्षे काम करता येते. तरीही काही वशिलेबाज अधिकारी एकाच पदावर सात ते दहा वर्षे कार्यरत आहेत. तरीही त्यांना याच पदावर आणखी काही वर्षे मुदतवाढ हवी आहे. दुसऱ्या बाजूला अनेक वशिलेबाज अधिकाऱ्यांनी महत्वाची पदे मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे बदलीसाठी पात्र नसलेल्या अधिकाऱ्यांमध्येही बदली होण्याची भिती सतावत आहे. बदल्यांमधील गैरप्रकार ‘लय भारी’ने चव्हाट्यावर आणले होते (The irregularities in the exchanges were brought to the fore by ‘Rhythm Heavy’).

उपसचिव, सहसचिव पदोन्नतीमध्ये ‘गडबड गोंधळ’; मंत्रालयात ‘कही खुशी, कही गम’

Uddhav Thackeray To Attend Opposition Meeting Called By Sonia Gandhi

‘लय भारी’ने पर्दापाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बदल्यांची फाईल परत पाठविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दणक्यामुळे मंत्रालयातील वशिलेबाज अधिकाऱ्यांना चाप बसेल. आता तरी गुणवत्तेच्या आधारावर बदल्या होतील, अशी चर्चा मंत्रालय वर्तुळात सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी