29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा मुदत वाढ!

पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा मुदत वाढ!

टीम लय भारी

मुंबई : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह विभागाने शुक्रवारी तसा आदेश जारी केला. नव्या आदेशानुसार ३१ ऑगस्टपर्यंत बदल्या केल्या जाणार आहेत. बदल्यांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार ३१ जुलैपर्यंत बदल्या होणार होत्या. पण त्याला १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता नव्या मुदतवाढीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत बदल्या केल्या जाणार आहेत (Re-extension of police officer staff transfers).

मुदतवाढ देताना बदल्यांची मर्यादाही वाढविली आहे. अगोदरच्या निर्णयानुसार २५ टक्के मर्यादेत बदल्या केल्या जाणार होत्या. आता त्या ३५ टक्के या मर्यादेत बदली केली जाईल. या मुदतवाढीमुळे पोलिसांमध्ये मात्र नाराजी पसरलीय. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करून पोलीस वैतागलेले आहेत. ‘कधी एकदाची बदली होतेय’ यासाठी पोलीस बांधव पाण्यात देव घालून बसलेत. अशात पुन्हा मुदतवाढ मिळाल्याने पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीत राजकारणाची खेळी, पदासाठी ‘ती’ बनावट ऑडिओ क्लिप

Police : राज्यातील 495 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (API) बदलीं रद्द

बदल्या आणि अर्थकारण या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. लक्ष्मीदर्शन घडविल्याशिवाय चांगल्या ठिकाणी बदली मिळत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष ठरली आहे (This is the white line on the black stone).

Re-extension of police officer staff transfers
मुंबई पोलीस मुख्यालय

अमोल कोल्हेंनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

Independence Day: Security Tightened Across Mumbai, Police on General Alert

नव्याने मुदतवाढ देण्यामागे सुद्धा अर्थकारण असल्याचा संताप पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सरकारला ३५ टक्के मर्यादेपर्यंत बदल्या करायच्या होत्या, तर पहिलाच आदेश तसा काढायला हवा होता. १० टक्के, २५ टक्के आणि आता ३५ टक्के… अशा मर्यादा घालून वेगवेगळे आदेश जारी करणे योग्य नाहीय. अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनाकारण छळण्याचा हा प्रकार असल्याचा संताप काही पोलिसांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी