35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजमिताली राजने इतिहास घडवला, ठरली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला...

मिताली राजने इतिहास घडवला, ठरली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू!

टीम लय भारी

लखनऊ : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू आहे. त्यात भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मिताली राजने (Mithali Raj) शुक्रवारी इतिहास घडवला. (Mithali Raj made history) ३८ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. (Mithali Raj became the first Indian woman cricketer to score 10,000 runs) अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली तर जगातील फक्त दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिस-या वनडेत हा विक्रम केला. आफ्रिकेविरुद्ध लखनऊ येथे झालेल्या सामन्यात मितालीने ३५ धावा करताच १० हजार धावांचा टप्पा पार केला. मितालीने हा मैलाचा दगड पार करताच बीसीसीआयने ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सने १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत आहे. शेरलोटला मागे टाकण्यासाठी आता मितालीला २९९ धावांची गरज आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल, अशी प्रार्थना तिचे चाहते आता करत आहेत!

या सामन्यात मितालीला फार धावा करता आल्या नाही. ती ३६ धावांवर बाद झाली. मितालीने वनडेत सर्वाधिक ६ हजार ९७४ धावा केल्या आहेत. वनडेत ७ हजार धावा करण्यासाठी तिला फक्त ३६ धावांची गरज आहे. तिने ८९ टी-२० सामन्यात २ हजार ३६४ धावा तर १० कसोटीत ६३३ धावा केल्या आहेत.

१० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत ३१० सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने, २११ एकदिवसीय सामने तर तब्बल ८९ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १९९९मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

यासोबतच मितालीच्या नावे अजून एक विक्रम प्रस्थापित आहे. क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच २००हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. त्याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६ हजार ९७४ धावांचा विक्रम तिच्या नावावर आहे. तसेच, सर्वाधिक सलग १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्याच नावावर आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी