30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमंत्रालयMNS scathing attack on Uddhav Thackeray  : मनसेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका, मुख्यमंत्र्यांनी...

MNS scathing attack on Uddhav Thackeray  : मनसेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह ‘इंग्रजी’तच करावे !

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’ शिथील करण्याचा आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल जारी केला. पण तब्बल 12 पानांचा हा आदेश इंग्रजीत असल्याने ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने ( MNS Scathing to Uddhav Thackeray on English order ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ‘इंग्रजीला महाराष्ट्राची ‘राजभाषा’ केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. शासनाच्या Mission Bigin Again या आदेशाच्या शीर्षकाला ‘पुनश्च हरी ओम’ म्हटलं की, 12 पानी आदेशाचा मराठी अनुवाद झाला, असं समजायचं का ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हसुद्धा इंग्रजीतच करावे’ ( MNS said, Uddhav Thackeray should give facebook live in English only) असा मार्मिक टोला शिंदे यांनी लगावला आहे.

ट्विटसोबत शिंदे यांनी ‘लॉकडाऊन’चा इंग्रजी आदेश टॅग केला आहे. याबाबत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लॉकडाऊन शिथील झाल्याची घोषणा झाल्यामुळे राज्यभरातील लोक हा आदेश पाहण्यासाठी त्यावर तुटून पडले. पण आदेश पूर्णपणे इंग्रजीत आहेत. 12 पानांचा हा आदेश 43 मंत्र्यांपैकी अर्ध्या मंत्र्यांना तरी कळला असेल की नाही माहिती नाही. सामान्य लोकांना मराठी भाषा कळते हे उद्धव ठाकरे यांना माहित नाही का ?

MNS scathing attack on Uddhav Thackeray  : मनसेची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह ‘इंग्रजी’तच करावे !

हे सुद्धा वाचा

Uddhav Thackeray’s announcement :  मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मंत्र्यांनी टाकला सुटकेचा निश्वास

…अन्यथा, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलणार नाही : मनसेचा इशारा

 

‘लॉकडाऊन’ शिथील केल्याबाबतचा हा आदेश असल्यामुळे घराघरातील प्रत्येक व्यक्तीला तो जाणून घ्यायचा होता. पण तो इंग्रजीत असल्याने सामान्य लोकांना तो कळत नव्हता. त्यामुळे लोकांच्या मनात अजूनही गोंधळाची अवस्था आहे. आदेश मराठीत असता, तर तो लोकांना व्यवस्थित समजला असता. ज्या 98 टक्के लोकांना मराठी समजते त्यांना डावलून 2 टक्के इंग्रजी समजणाऱ्यांसाठी शिवसेना सरकार काम करीत आहे का ? असाही सवाल शिंदे यांनी केला आहे.

Mahavikas Aghadi

शिंदे यांनी इंग्रजीतूनही उद्धव ठाकरे व महापालिकेला टोला लगावणारे दुसरे एक ट्विट केले आहे. महत्वाचे आदेश मराठीमध्ये अनुवादित करणे शक्य नसेल, तर अनुवादाचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या. मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही हे काम निश्चितपणे पार पाडू असे शिंदे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी