34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमागौहर खानचा बॉयफ्रेंड झैद दरबारसोबत साखरपुडा

गौहर खानचा बॉयफ्रेंड झैद दरबारसोबत साखरपुडा

टीम लय भारी 

बिग बॉस Bigg Boss-7 winner गौहर खानने Gauhar khan आता स्वतः आपल्या चाहत्यांना सरप्राइज देत बॉयफ्रेंड झैद दरबारसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली आहे.

झैद दरबारसोबतच्या आपल्या नात्यामुळे चर्चेत आहे. गौहर आणि झैद येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचेही म्हटले गेले, मात्र गौहरने या वृत्ताचे खंडन केले होते. पण आता स्वतः तिने आपल्या चाहत्यांना सरप्राइज देत बॉयफ्रेंड झैद दरबारसोबत साखरपुडा केल्याची घोषणा केली आहे.

झैद दरबार हा प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. तो स्वत: एक डान्स कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएंसर आहे. अलीकडेच त्याने गौहरसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करुन तिने लग्नाला होकार दिला असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये एंगेजमेंट रिंग इमोजीही शेअर केला आहे.

बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती असलेल्या गौहर हिने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती झैद दरबारसोबत दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर झैदने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

झैदसोबत 24 डिसेंबर रोजी लग्न करणार गौहर

नुकत्याच आलेल्या स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार गौहर खान यावर्षी 24 डिसेंबरला प्रियकर झैदसोबत लग्न करणार आहे. हे लग्न मुंबईत होणार आहे ज्यात काही मोजके जवळचे नातेवाईक आणि मित्रच उपस्थित राहतील. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. विवाहाचे सर्व विधी तीन दिवस चालतील. गौहरची बहीण निगार खान आणि कुटुंबीय लवकरच दुबईहून भारतात येणार आहेत. विशेष म्हणजे झैद गौहरपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी