31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयशाळांसाठी दिवाळीची सुटी आता १४ दिवस, शिक्षण मंत्र्यांचा नवा निर्णय

शाळांसाठी दिवाळीची सुटी आता १४ दिवस, शिक्षण मंत्र्यांचा नवा निर्णय

टीम लय भारी

मुंबई :  शाळांसाठी दिवाळीच्या सुटीचा कालावधी आता १४ दिवसांचा करण्यात आला आहे. शिक्षक व पालक यांनी जोरदार टीका केल्यामुळे हा कालावधी वाढविण्यात आला आहे ( Varsha Gaikwad extended 14 days Diwali vaction for schools ).

अगोदरच्या निर्णयानुसार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाच दिवस दिवाळीची सुटी जाहीर केली होती. पण ही सुटी फारच अपुरी आहे. ‘कोरोना’ काळात शाळा सुरू नव्हत्या. पण ऑनलाईन वर्ग चालू होते. शिक्षकांना या ऑनलाईन वर्गांबरोबरच ‘कोरोना’च्या कामांची अतिरिक्त जबाबदारीही होती.

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर गायकवाड यांनी सुटीचा कालावधी वढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे ( Varsha Gaikawad changed her decision ).

नव्या निर्णयानुसार ७ ते २० नोव्हेंबर अशी १४ दिवस ही सुटी असेल, असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

दहावी – बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार

राज्यात टप्प्याटप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगानेच नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली तर या चार इयत्तांचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले जातील ( Varsha Gaikwad said, SSC and HSC exam will be conduct in May ).

दहावी – बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत घ्याव्या लागतील. २३ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू झाले तरच मे महिन्यांत परीक्षा घेणे शक्य होईल. मे महिन्यानंतर पावसाळा सुरू होतो. या कालावधीत परीक्षा घेणे कठीण जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी