31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसिनेमापवनदीप राजन आणि कांजीलाल या जोडीने, इम्रान हाश्मीच्या गाण्यावर केला डान्स

पवनदीप राजन आणि कांजीलाल या जोडीने, इम्रान हाश्मीच्या गाण्यावर केला डान्स

टीम लय भारी

मुंबई :  इंडियन आयडॉल 12 स्पर्धक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सुरुवातीला दोघांच्या गाण्याने लोकांच्या हृदयावर राज्य केले (Pawandeep Rajan and Kanjilal danced to Imran Hashmi song).

सोशल मीडियावर त्याच्या फॅन क्लबची एक लांबलचक यादी तयार झाली आहे. अलिकडेच त्यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो त्यांच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पवनदीप राजन आणि अरुणिता इम्रान हाश्मीच्या ‘पी लू’ या सर्वात लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या या व्हिडिओमुळे धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ त्याच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आला आहे, ज्यात थोडेसे एडिटिंग देखील आहे. या दोन्ही जोडीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अक्षय कुमारच्या आईचे निधन, ‘ती माझा आधार होती’ अशा शब्दात केला मातृशोक व्यक्त

‘बसपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाचे आणखी एक गाणे व्हायरल

 

आशा भोसलेंनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायले गाणे

Pawandeep Rajan-Arunita Kanjilal Dance Like Nobody’s Watching in New Romantic Video

Pawandeep Rajan and Kanjilal danced to Imran Hashmi song
या दोन्ही जोडीने चाहत्यांची मने जिंकली आहेत

चाहत्यांना दोघांची जोडी आवडली

हळूहळू त्यांच्या गायनाबरोबरच लोकांना त्यांची जोडी देखील आवडायला लागली आहे. दोघांच्या गायनाबद्दल बोलले तर पवनदीप राजनने इंडियन आयडॉल 12 चे विजेतेपद पटकावले आहे. तर अरुणिता कांजीलाल उपविजेती होती. शो दरम्यान, चाहत्यांनी दोघांवर त्यांचे प्रेम दाखवले. शो जरी संपला असला, तरी देखील दोघांची लोकप्रियता अबाधित आहे. शो दरम्यान, दोघांच्या गाण्याव्यतिरिक्त, रोमँटिक अँगल देखील दाखवला होता (During the show, in addition to the duo song a romantic angle was also shown).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी