34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयकलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खात आहात : गोपीचंद...

कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खात आहात : गोपीचंद पडळकर

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांच्या बेळगाव महापालिका निवडणुकेच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खात आहात, असे पडळकर म्हणाले (Gopichand Padalkar attack on Sanjay Raut).

महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खात आहात. हे बेळगावलाच नाहीतर संपूर्ण हिंदुस्थानाला समजले आहे, असे पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवारांना म्हणाले मांजर!

गोपीचंद पडळकरांची राज्यपालांकडे विनंती, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच बसवावा

बेळगाव महापालिका निवडणुकीत मराठी माणसाचा पराभव झाला त्याचा तुम्ही आनंद साजरा करत आहात. अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती. यावर प्रतुत्यर देताना पडळकर म्हणाले, बेळगाव मध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील, असे अनेक… राऊत यांना मराठी वाटत नाही का? असा सवाल पडळकरांनी केला.

गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना बोचरे पत्र, चार मंत्र्यांवर डागली तोफ

Pune BJP seeks Sanjay Raut’s arrest over ‘threatening remark’

त्याचबरोबर हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादतात व धर्मांच्या सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता. अशा तुमच्या पाखंडी वृतीचा बुरखा फाटला आहे आणि खरा चेहरा प्रत्येक हिंदू माणसाच्या समोर अजळून आला आहे. असे म्हणत पडळकरांनी ठाकरे सरकारवर सुद्धा निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी