31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeसिनेमा'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्ती नाही :आदित्य ठाकरेंनी ठणकावले

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्ती नाही :आदित्य ठाकरेंनी ठणकावले

टीम लय भारी 

मुंबई : सध्या संपूर्ण भारतात ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून बरीच चर्चा सुरू आहे. अनेक राज्यांत हा चित्रपट करमुक्त (Tax Free Movie) करण्यात आला असून . महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी सतत होत आहे. भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी विधानसभेतही ही मागणी केली होती. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर (Kashmir Pandit) झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. एकीकडे या चित्रपटाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकीय वर्तुळात टिकाटिपणी केली जात आहे.(The Kashmir Files Movie Tax Free In Maharashtra)

देशभरात उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला असून, महाराष्ट्रातही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपनं केली आहे. पर्यावरमंत्री आदित्य ठाकरेंनी(Cabinet Minister of Tourism and Environment Aditya Thackeary) नुकतंच माध्यमंही संवाद साधन हा चित्रपट करमुक्त का केला जाणार नाही याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी आदित्य ठाकरेंना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरेंनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही, अशी माहिती दिली.

“जर या चित्रपटाच्या आर्थिक कमाईतून कश्मिरी पंडितांच्या भवित्यव्यासाठी काही चांगले होणार असेल, तर नक्की प्रत्येकजण त्यात हातभार लावेल. पण मला असेल वाटते की एखादी कला, त्यातील संस्कृती ही त्या जागी असायला हवी. त्याचा मान आपण नक्की ठेवायला हवा. त्याचे कौतुक नक्कीच झाले पाहिजे. पण त्यासोबतच खरी सत्य परिस्थिती काय आहे याबद्दल त्याचा इतिहास, भविष्य याविषयी चर्चा व्हायला हवी”, असेही ते म्हणाले.

“द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, असे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही, कारण लोक स्वतः पैसे खर्च करून हा चित्रपट पाहत आहेत. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे आणि त्याचा वापर ते करत आहेत”, असे आमचे मत आहे.

याच चित्रपटाच्या संदर्भात (२४ मार्च) रोजी शिवसेना खासदार संजय राहुतांनी (Sanjay Raut) देखील प्रतिक्रिया प्रसारमाध्यमां समोर मांडली. बाळासाहेबांच्या जीवनावर आम्ही ‘ठाकरे’ हा सिनेमा बनवला होता. चांगला चित्रपट आहे. मात्र, तो महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी आम्ही कधी केली नाही. लोक येऊन बघतील. द कश्मीर फाइल्सवरून जे राजकारण चाललं आहे, ते योग्य नाही. काश्मीरबद्दल शिवसेनेच्या काय भावना आहेत, हे संपूर्ण देश चांगलं जाणून आहे, असंही राऊत म्हणाले.

हे सुध्दा वाचा 

The Kashmir Files Movie Tax Free In Maharashtra

Aaditya Thackeray reply to Disha : ‘सेम टू यू’, दिशा पटाणीला आदित्य ठाकरेंचा रिप्लाय

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी