29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रभक्तांना आणि चमच्यांना इतकं मानसिक बळ येतं कुठून? : संजय राऊत

भक्तांना आणि चमच्यांना इतकं मानसिक बळ येतं कुठून? : संजय राऊत

टीम लय भारी 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील रोखठोक या सदरामध्ये चंद्रकांत पाटलांच्या यांच्या एका विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून आजपर्यंत भाजप – शिवसेना यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. संजय राऊत यांनी आपल्या सदरामध्ये चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात की, “मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है” Sanjay Raut criticizes Chandrakant Patil

राऊतांनी आपल्या लेखात म्हटले की,  काँग्रेस काळात चमचे होते.  आणि आता मोदी काळात अंधभक्त आहेत.  फक्त नावात बदल  झाले आहे.  काँग्रेस काळात ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. आज मोदी भक्तांनी ‘मोदी इज इंडिया’ असे जाहीर केले. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत असे टोक भक्तांनी गाठले, पण आता कडेलोट केलाय तो महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील यांनी असं त्यांनी म्हटलं आहे.

पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवीत सांगितले, “श्री. नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत.” पाटलांची ही विधाने ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल.

भक्तांना आणि चमच्यांना हे इतके मानसिक बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे.मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है, असा टोलाही त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना लगावला. असे चमचे आम्ही पाहिले नाहीत, असा चिमटाही त्यांनी घेतला.

https://www.saamana.com/rokhthok-by-sanjay-raut-on-blind-followers-of-bhartiya-janta-party/

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी