33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeसिनेमा‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट’ आणणार वर्षभरात १० मराठी चित्रपटांचा नजराणा

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट’ आणणार वर्षभरात १० मराठी चित्रपटांचा नजराणा

टीम लय भारी

मुंबई : वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तम मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली आहे. प्रेक्षकांची ही आवड लक्षात घेऊन ‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट ग्रुप’ने आगामी काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित 10 मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने स्वतंत्र बिझनेस युनिट सेट-अप तयार केला आहे, जो या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मराठी चित्रपट उद्योगाशी संबंधित असलेल्या कोअर टीमद्वारे चालवला जाईल (Ultra Media and Entertainment to bring 10 Marathi films in a year).

साताऱ्यातील मिलिटरी गावाचा इतिहास जगासमोर येणार, मंत्री दादा भुसे यांचा निर्णय

‘रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे’ अशी मागणी करत २७ सप्टेंबरला रंगकर्मींचे ‘पितृस्मृती आंदोलन’

अल्ट्राच्या बॅनरखाली आगामी वर्षभरात रोमान्स, विनोदी, कौटुंबिक मनोरंजक, सामाजिक,पौराणिक, भयपट, साहसपट अशा वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. उत्तम कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार, संगीत दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावान नवोदितांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे (Ultra banner of, diverse films like Romance, Comedy, Family Entertaining, Social, Mythological, Horror, Adventure film will be produced).

यापैकी बहुतांश चित्रपट अल्ट्रा ‘इन-हाऊस’ बनवणार असून, काही चित्रपटांसाठी इतर प्रोडक्शन हाऊसेस आणि निर्मात्यांसोबत धोरणात्मक भागीदारीमध्ये सह-निर्मितीसुद्धा करेल. याबाबतची बोलणी सध्या सुरू असून, प्रगतीपथावर आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये दर्जेदार निर्मितीमूल्ये, उत्तम कथाविष्कार आणि सादरीकरण सोबत सुमधूर संगीत याद्वारे रसिकांसाठी अत्याधुनिक काँटेंट देण्याकडे अल्ट्राचा अधिक कल असेल (ultra ‘in-house made Most of the films).

हे सर्व मराठी चित्रपट देशात आणि परदेशात प्रदर्शनाच्या उद्देशानं बनवले जाणार आहेत. वर्तमान परिस्थिती लक्षात घेता जर चित्रपटगृहे पुन्हा सुरू होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला, तर हे चित्रपट ओटीटी आणि इतर आघाडीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि उपग्रह चॅनेल्सवर प्रदर्शित केले जातील.

शिल्पा शेट्टी बनणार एका नव्या रियालिटी शो ची जज

Marathi short film series explores mental health issues among youth, encourages discussions (msn.com)

या चित्रपटांचे पोस्ट प्रॉडक्शन अल्ट्राच्या मुंबईतील अत्याधुनिक ‘इनहाऊस’ स्टुडिओमध्ये केले जाईल. जनसंपर्क, सोशल आणि डिजिटल मीडिया प्रमोशनही अल्ट्राच्या विशेष ‘इनहाऊस’ टीमद्वारे केले जाईल. यापूर्वी अल्ट्राने ‘गोंद्या मारतंय तंगडं’, ‘लोणावळा बायपास’, ‘होऊन जाऊ दे’ आदी मराठी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण केलं आहे.

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.चे एम.डी श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले की, आम्ही अल्ट्राच्या माध्यमातून 1996 पासून जागतिक पातळीवरील काँटेंटची निर्मिती आणि वितरण करण्यात आघाडीवर आहोत. आम्ही नेहमीच रसिकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांची आवडनिवड जोपासत निर्मिती करण्याचं काम केलं आहे. अलिकडच्या काळात मराठी चित्रपटांचे योगदान आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेता, आम्ही पुन्हा एकदा मराठी चित्रपट उद्योगाचा भाग होण्यास प्रवृत्त झालो आहोत. प्रेक्षकांची वाढती अभिरुची लक्षात घेऊन  वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीचा आमचा कल आहे. जो चोखंदळ रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा आम्हाला विश्वास आहे. सध्याच्या काळात मनोरंजन उद्योग एका स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात आहे. आम्ही प्रतिभावान चित्रपट निर्माते आणि कलाकारांना नवीन दृष्टीकोन देण्यासोबतच जागतिक प्रेक्षकांचं स्वागत करण्याचे प्रयत्न करू इच्छित आहोत (Ultra Media and Entertainment Pvt. Ltd.  Mr. MD Sushilkumar Agarwal).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी