33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईलोकसंख्या आकडेवारीपेक्षा 'या' गोष्टींवर लक्ष द्या; अ‍ॅड. कपिल सिब्बल

लोकसंख्या आकडेवारीपेक्षा ‘या’ गोष्टींवर लक्ष द्या; अ‍ॅड. कपिल सिब्बल

संयुक्त राष्ट्रसंघाने बुधवारी लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली. लोकसंख्येच्या अहवालानुसार, भारत या वर्षाच्या मध्यापर्यंत जवळपास 3 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. मात्र चीनला मागे टाकत लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातला सर्वात मोठा देश ठरला असला तरी यापेक्षा जीडीपी, बेरोजगारी आणि महागाईच्या आकड्यांकडे लोकांनी बघितले पाहिजे, असा सल्ला राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला.

लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. चीनच्या 142 कोटी 50 लाख लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या 142 कोटी 80 लाखांवर गेली आहे. मात्र लोकांनी इतर आकडेवारीवर नजर टाकली पाहिजे. जागतिक बँकेच्या माहितीनुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार 17.73 ट्रिलियन डॉलर्स इतका असून भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार केवळ 3.18 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. चीनमध्ये बेरोजगारी 4.8 टक्के आहे तर आपल्याकडे बेरोजगारीचा दर 7.7 टक्के इतका आहे. महागाईचा विचार केला तर चीनमध्ये केवळ 1 टक्के महागाई असून भारतात महागाईचा दर 5.1 टक्के इतकी आहे, याचा विचार करावा, असे सिब्बल यांनी सांगितले. एकुणच ही खूप गंभीर समस्या आहे.

हे सुद्धा वाचा:

ज्येष्ठ ॲड. कपिल सिब्बल लढणार पीएम मोदींची केस; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सरन्यायाधीशांचे राज्यपालांच्या भूमिकेवर तीक्ष्ण सवाल

नरेंद्र मोदींचा २०२४ मध्ये पराभव अटळ (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विशेष लेख)

Adv. Kapil Sibal tweet on India ahead of China Population

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी