30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईबारामती म्हणजे सोन्याच्या विटा असलेली लंका, चित्रा वाघ यांचा आरोप

बारामती म्हणजे सोन्याच्या विटा असलेली लंका, चित्रा वाघ यांचा आरोप

लयभारी न्यूज नेटवर्क  

जामखेड : बारामती ही सोन्याच्या विटा असलेली लंका आहे. परंतु त्या सोन्याच्या विटा तुमच्या – आमच्या काहीच कामाच्या नाहीत. बारामतीच्या मृगजळाच्या पाठीमागे न धावता आपल्या हक्काच्याच माणसाला (राम शिंदेंना) साथ द्या, असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले.

महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी हळगाव परिसरातील नान्नज येथे घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात चित्राताई बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, सरपंच विद्याताई मोहळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, पंचायत समितीच्या सदस्या मनिषा सुरवसे, माजी नगराध्यक्ष अर्चना राळेभात, धनलक्ष्मी हजारे, मायाताई आव्हाड, सरपंच दिपाली गर्जे, हिनाभाभी आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

माझ्या भावाला तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही – चित्रा वाघ 

आपल्या हक्काचा माणूसच (राम शिंदे) कर्जत जामखेड मध्ये रामराज्य आणू शकतो. राम शिंदे यांनी पालकमंत्री असताना मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला. त्याच विकास कामांच्या बळावर आम्ही जनादेश मागत आहोत. ज्यांनी सत्तेत असताना दुष्काळी भागाच्या विकासासाठी काहीच केले नाही ते आता मतांचा जोगवा मागत या भागात फिरत आहेत. या भागातील सुज्ञ जनता माझ्या भावाला तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवेल हा ठाम विश्वास आहे असे प्रतिपादन चित्राताईंनी केले.

50 वर्षे बारामतीकरांचे हात कुणी धरले होते – आशाताई शिंदे 

यंदाची निवडणूक घराणेशाही विरूद्ध लोकशाही अशी आहे. समोरचा उमेदवार प्रस्थापित कुटूंबातील आहे. पन्नास वर्षांपासून त्यांचे कुटूंब राजकारणात आहे. निवडणूकीच्या तोंडावर ते लोक कर्जत – जामखेडमध्ये बारामतीसारख्या विकासाची भाषा करतात. मग यापूर्वी ते सत्तेत होते, त्यांचे कोणी हात धरले होते ? असा सवाल उपस्थित करत राम शिंदे यांना तुम्ही अधिकाराने बोलू शकता, समस्या मांडू शकता, समोरचे लोक बारामती व मगरपट्टामध्ये राहतात. तेथे जाण्यासाठी पास लागतात. त्यांना भेटण्यासाठी जनतेला ताटकळत बसावे लागणार आहे. यामुळे चुक करू नका असे अवाहन राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी केले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी