31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईबेस्टचा ३५४ महामार्ग बदलला, विक्रोळीकरांमध्ये संताप; शिवसेना चिडीचूप; भाजपने आवाज उठवला

बेस्टचा ३५४ महामार्ग बदलला, विक्रोळीकरांमध्ये संताप; शिवसेना चिडीचूप; भाजपने आवाज उठवला

टीम लय भारी

मुंबई : विक्रोळी (कन्नमवार नगर) ते शिवाजी पार्क या मार्गावर ३५४ क्रमांकाची बस सन १९८३ पासून धावते. परंतु या मार्गात बदल करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे (BEST 354 highway changed, anger among Vikroli citizens).

गेली तब्बल ३८ वर्षे ही बस व्यवस्थित चालू होती. पण त्यात अचानक कन्नमवारनगर ते वडाळा असा बदल करण्यात आल्यामुळे विक्रोळी परिसरातील जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पीएम केयर्स फंडवर सुप्रीम कोर्टचे माजी जस्टीस मदन लोकूर यांचा केंद्रावर सवाल

‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

बेस्ट प्रशासनाच्या या जनहितविरोधी निर्णयामुळे दादरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे विक्रोळीतील जनतेमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेस्टच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाने आज स्वाक्षरी मोहिम आयोजित केली होती. पक्षाच्या विक्रोळी विधानसभा महामंत्री केतकी अरविंद सांगळे यांनी पुढाकार घेऊन ही स्वाक्षरी मोहीम राबविली.

BEST 354 highway changed, anger among Vikroli citizens
बेस्ट प्रशासनाच्या या जनहितविरोधी निर्णयामुळे दादरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली

यावेळी माजी आमदार मंगेश सांगळे, नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, सोनाली बोराडे, प्रथमेश राणे, विशाल मयेकर, सिमरन खराडे, वैशाली सावंत आदी भाजपचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

हे लोक गांधींऐवजी सावरकांना राष्ट्रपिता बनवतील; राजनाथ सिंहांच्या वक्तव्यावरून ओवैसींचा टोला

Maharashtra Reports 2,069 COVID-19 Cases, 43 Deaths; 3,616 Patients Recover

भाजपने राबविलेल्या या स्वाक्षरी मोहिमेत हजारो लोकांनी सहभाग घेतला. सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्येला वाचा फोडली म्हणून केतकी सांगळे यांचे जनतेनेही आभार मानले.

Maratha Reservation

विशेष म्हणजे, कन्नमवारनगर येथे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. बेस्ट प्रशासनात व मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. स्थानिक आमदार हे सुद्धा शिवसेनेचेच आहेत. परंतु शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने या समस्येवर ब्र शब्द सुद्धा काढलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर भाजपने ही मोहिम राबविल्याने जनतेमधून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी