27 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरमुंबईभातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

भातसा धरण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता, भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे ०.५० मी. ने उघडण्यात आले असून २७२.२७ Cumecs (९६१५.२१५ cusecs) एवढा पाण्याचा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, तसेच सापगाव नदीकाठावरील इतर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या भातसा नगरच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिला आहे.

आज (दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी) सायंकाळी ०६:३० वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १४१.६६ मी, एकूण पाणी साठा ९६४.४५७ दलघमी व धरणातील साठयाची टक्केवारी ९८.८०% आहे. भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता, भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे ०.५० मी. ने उघडण्यात आले असून २७२.२७ Cumecs (९६१५.२१५ cusecs) एवढा पाण्याचा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे.

त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर – मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, तसेच सापगाव नदीकाठावरील इतर गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या व वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. यासंबंधी नदी काठावरील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही छोटी नदी भातसा नदीची उपनदी आहे. धरण शहापूर या गावापासून २० किलोमीटरवर आहे.

हे सुद्धा वाचा
पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने दिली अनोखी भेट
कुणाला मिळेल शिवसेना पक्ष आणि चिन्ह….
कपिल सिब्बल काय म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत…
धरणाचे बांधकाम १९६९ मध्ये सुरू झाले. सुरुवातीला कामाचा वेग संथ होता. जेव्हा काम सुरू झाले त्यावेळी १४ कोटी रुपये एवढाच खर्चाचा अंदाज होता. इ.स.१९७३ पर्यंत कामाची गती फार कमी होती. तेव्हा पाटबंधारे खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले.

डिसेंबर १९८३पर्यंत हया प्रकल्पाचा खर्च ८० कोटी रुपयांवर तर १९९४-९५पर्यंत हा खर्च ३५८ कोटी रुपयांवर पोहचला. २००० सालापर्यंत काम पूर्णावस्थेला आले. मुंबई शहराचा ५० टक्के(१३५ कोटी लिटर) पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. विहार, तानसा, आणि वैतरणा या धरणांतून उरलेले ५० टक्के पाणी उचलले जाते. महाराष्ट्रातील दगडी धरणांमध्ये भातसा धरण सर्वात उंच आहे.

वीज उत्पादन
धरणाच्या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून त्यातील पाणी उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. उदंचन पद्धत ही या धरणाचे वैशिष्ट्य आहे. विद्युत निर्मिती करून वारपलेले पाणी बोगद्याद्वारे पुन्हा नदीत सोडले जाते. हे सुद्धा या धरणाचे वैशिष्ट्य आहे. या धरणाच्या पायथ्याशी एक विद्युत गृह बांधले असून एका व्हर्टिकल जनरेटरच्या मदतीने ३६ घनमीटर प्रतिसेकंद इतके पाणी वापरून त्यापासून १५ मेगॅवॅट इतकी विद्युत  निर्मिती केली जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी