26 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरराष्ट्रीयकुणाला मिळेल शिवसेना पक्ष आणि चिन्ह....

कुणाला मिळेल शिवसेना पक्ष आणि चिन्ह….

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? यावरुन आमनेसामने आहेत. शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेल्या न्यायलयीन सुनावणीचा आज दुसरा टप्पा सुरू झाला. आमदारांच्या अपात्रतेसंबंधित आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर केला आहे, त्याचा आदर केला पाहिजे, असं सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बजावलं. तसेच या संबंधित पुढची सुनावणी आता दोन आठवड्यानंतर होणार आहे. असे असताना शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

याबाबत बोलताना सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळण्याची शक्यता आहे’ असं सिद्धार्थ शिंदे म्हणाले. तर ‘निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का ते तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. मात्र तो निर्णय काय असेल हे आताच सांगता येणं कठीण आहे,’ असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

सिद्धार्थ शिंदे म्हणाले, सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दोन सलग सुनावण्या आहेत. पहिली पक्ष आणि चिन्हांसंदर्भात याचिका आहे. पक्ष आणि चिन्ह अजूनही शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तो निवडणूक आयोगाचा निर्णय होता. त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाली आहे. निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का ते तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. मात्र तो निर्णय काय असेल हे आताच सांगता येणं कठीण आहे.

सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेच्या आधारे निर्णय दिला आहे. शिवसेना ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे कायमस्वरुपी संस्थापक राहतील अशी घटना होती. मात्र निवडणूक आयोगाने त्यांना लोकशाहीमध्ये कोणतेही पद हे तहहयात राहू शकत नाही, असं म्हटलं होतं. पुढे त्यांना निवडणूक करुन अध्यक्ष केले होते.

हे सुद्धा वाचा
कपिल सिब्बल काय म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत…
“ते नेहमी मौन रहायचे पण..” मनमोहन सिंह यांच्याबद्दल कॉंग्रेस खासदार हे काय म्हणाले?
विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत काय केलं; आमदार अपात्रतेवरुन सर्वोच्च न्यायालय गंभीर

यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रामुख्याने पक्षाची घटना तपासली जाईल. त्यामध्ये पक्षाच्या चिन्हावर किती निवडून आलेले आहेत, ते कोणाच्या बाजूने आहेत हे तपासले जाईल. निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का ते तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. मात्र तो निर्णय काय असेल हे आताच सांगता येणं कठीण आहे, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी