31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईमहानगरपालिकेचा अतीशहाणपणा, RTI कार्यकर्त्याला कार्यालयात केली प्रवेशबंदी !

महानगरपालिकेचा अतीशहाणपणा, RTI कार्यकर्त्याला कार्यालयात केली प्रवेशबंदी !

 

टीम लय भारी
मुंबई : आरटीआय कार्यकर्त्यांना महानगरपालिकेने कार्यालयात येण्यासाठी बंदी घातली आहे. त्याविषयी कार्यकर्ते श्री जाहिद अली शेख यांनी उच्च न्यायालयात तक्रार केली आहे. (Bmc districts rti leader to enter bmc building).

Bmc
मुंबई न्यायालय

श्री अमरजीत हरिप्रसाद वरूण यांना धमक्या देऊन शिवीगाळ केली गेली. त्यामुळे त्यांच्या मनाचे खच्चीकरण होते. या अशा कार्यकर्त्यांमूळे कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा वेळ तक्रारदारांना उत्तरे देण्यात जातो. यामुळे कामावर परिणाम होतो. या वरून जाहिद अली हे व्यावसायिक तक्रारदार असल्याचे निष्पन्न होते.

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

उच्च न्यायालयाचा देवेंद्र फडणविसांना दणका, अधिकाऱ्यांच्या इस्त्रायल दौऱ्यावर उपस्थित केला सवाल

पालिकेकडून असेही सांगण्यात आले की, धारावी ही मोठी झोपडपट्टी आहे. इथे रोज कित्येक अनाधिकृत बांधकामे होत असतात. अश्या बांधकामांची चौकशी प्राधान्यक्रम ठरवून विभागाकडून केली जाईल. त्यानुसार श्री जाहिद अली शेख यांची तक्रार बघून त्यात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल.

यावरून असा निष्कर्ष निघतो की सदर कार्यकर्ते यांनी या तक्रारी वैयक्तिक वाद, वैमनस्य आणि आकसापोटी केलेल्या आहेत. आणि या कारणामुळे श्री जाहिद अली शेख यांना यापुढील वैयक्तिक स्वार्थासाठी केलेल्या निरर्थक तक्रारींना यापुढे महत्त्व दिले जाणार नाही. या निरर्थक तक्रारींना मज्जाव करण्यासाठी त्यांना जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या इमारतीत प्रवेष निषिद्ध करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षकांची भरती, त्यात धनगरांवर अन्याय

Supreme Court To Hear Banks’ Challenge Against RBI’s RTI Notices For Disclosures On August 17

या कार्यकर्त्यांनी धारावीतील अनुराधा साळवे यांच्या वतीने श्री संजय भालेराव यांच्या अतिरिक्त बांधकामातील अधिकच्या बांधकामाचे निष्कासन करावे, अशी तक्रार केली होती. त्यांच्या मारहाणीमुळे सदर कार्यकर्ता हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समजते.

वरील प्रकरणावरून आपण तक्रार मागे घेत असल्याचे जाहिद यांनी पत्राद्वारे कळवले आहे. तक्रारदार तक्रार करून संबंधित व्यक्तींकडून पैसे उकळून त्यानंतर तक्रार मागे घेत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे अनेक तक्रारी मागे घेतल्या आहेत. पैसे घेण्याप्रकरणी त्यांच्याविषयी अनेक मौखिक तक्रारी सुद्धा ऐकू आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी