29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईकोस्टल रोडचे काम 76 टक्के पूर्ण; 13 हजार कोटींच्या घरात खर्च,नोव्हेंबर 2023...

कोस्टल रोडचे काम 76 टक्के पूर्ण; 13 हजार कोटींच्या घरात खर्च,नोव्हेंबर 2023 पर्यंत काम होणार पूर्ण

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. मच्छीमार बांधवांच्या आक्षेपामुळे वरळी सी लिंक येथे ज्या ठिकाणी ‘कोस्टल रोड’ जोडला जाणार आहे, तेथील नियोजित कामांबद्दल करण्यात आल्याने कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात 600 कोटीची वाढ झाली आहे. त्यातच जीएसटी, वीज वापर व इतर खर्चात वाढ झाल्याने प्रकल्पाचा खर्च 13 हजार 300 कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. नागरी अधिकार्‍यांनी असेही सांगितले की मुंबई कोस्टल रोड प्रकल्प 2024 पर्यंत वाहतुकीसाठी सुरु होईल.

4 जूनपर्यंत ‘कोस्टल रोड’ 76 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती ‘कोस्टल रोड’ मंतय्या स्वामी, प्रमुख अभियंता, कोस्टल रोड यांनी दिली आहे. संपूर्ण कोस्टल रोडमध्ये तीन इंटरचेज असतील, एक ब्रीच कँडी येथील अमरसन्स गार्डन येथे, एक हाजी अली येथे आणि वरळी येथे असेल. या इंटरचेजची लांबी 15.66 इतकी आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत कोस्टल रोडवर दोन बोगदे आहेत. जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे बोगदे आहेत.

बीएमसीने दुसऱ्या बोगद्याचे अंतिम यश 30 मे ला संपादन केले होते. पहिला बोगदा तयार आहे. मात्र, दुसऱ्या बोगद्याच्या आत रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यासाठी अजून ३-४ महिने लागतील. नोव्हेंबरमध्ये रस्ता उघडल्यानंतर दोन्ही टोकांची वाहतूक एका बोगद्यामधून जाऊ शकते, कारण प्रत्येक बोगद्याला वाहनांच्या वाहतुकीसाठी तीन लेन असतात. बोगदा हा मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा:

शहापूरच्या आदिवासीबहुल खोस्ते गावातील स्वधर्म फाऊंडेशनच्या सांस्कृतिक व आरोग्य केंद्राचा उद्या लोकार्पण सोहळा

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शाईफेक करून हल्ला

संत निवृत्तीनाथांची पालखी श्रीगोंद्यात दाखल; संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा पडणार पार

वादळ आणि लाटा यांना रोखू शकेल अशी 7.4 किलोमीटर लांब भिंत बांधण्यात आली आहे.पाणी रोखण्यासाठी 1 ते 3 वजन असणाऱ्या आर्मर खडकांचा यांत समावेश केला आहे. संपूर्ण कोस्टल रोडवर रोडवर एकूण 16 फ्लड गेट बांधण्यात आले आहेत. जेव्हा भरती आणि जोरदार पाऊस एकाच वेळी कोसळेल त्यावेळी हे फ्लड गेट बंद करण्यात येतील त्याचसोबत शहरात साचलेलं पाणी समुद्रात सोडण्यासाठी उपसून समुद्रात फेकलं जाईल अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडण्यासाठी 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प बांधत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी