31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईदहिहंडी उत्सवादरम्यान दुर्घटना झाल्यास BMC ची गोविंदांसाठी डॉक्टरांची फौज

दहिहंडी उत्सवादरम्यान दुर्घटना झाल्यास BMC ची गोविंदांसाठी डॉक्टरांची फौज

मुंबईत दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मोठे थर लावत दहीहंडी फोडताना बरेचदा गोविंदा पथकातील तरुणांना इजा होते. या उत्सवात हंडी फोडताना जमिनीवर आदळून जखमी गोविंदाना वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यूच्या घटना झाल्या आहेत. ही संभाव्यता लक्षात घेऊन पालिकेच्या रुग्णालयात जखमी गोविंदाच्या उपचारासाठी राखीव खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात १०, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात ०७ रूग्णशय्या आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ४ रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.

किरकोळ जखम झालेल्या जखमी गोविंदांना तातडीने प्रथमोपचार देणे, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांना तातडीने उपचार देणे याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची यांची नियुक्ती केली आहे.

हे सुद्धा वाचा 
२४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार,सरकारचा सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
ठाण्यातील मेट्रोचा मार्ग सीएमने क्लियर केला
सोनिया गांधीचे मोदींना पत्र, विशेष अधिवेषनात ‘या’ नऊ मुद्यांवर चर्चा करा…

महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जीकल मटेरिअल, पीओपी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्स रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांनी या काळात दक्ष रहावे, अशा सूचनाही महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना व आरोग्य यंत्रणेला प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी