31 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमुंबईठाण्यातील मेट्रोचा मार्ग सीएमने क्लियर केला

ठाण्यातील मेट्रोचा मार्ग सीएमने क्लियर केला

मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभाग यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ठाण्यातील मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो टप्पा-4, 4अ, 10 आणि 11 या मेट्रो मार्गांसाठी मौजे मोघरपाडा येथे सर्वे नं.30 मधील 174.01 हेक्टर क्षेत्र एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येईल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक जमीन संपादनाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मोघरपाडा या ठिकाणच्या 167 भाडेपट्टेधारक शेतकरी आणि 31 अतिक्रमणधारक ग्रामस्थ यांच्यासाठी भरपाईची सुयोग्य योजना एमएमआरडीएने त्यांच्या स्तरावरुन करण्यात येणार आहे.

‘ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो ५’ चे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ठाणे शहरातील काम सध्या सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, इतर मेट्रो मार्गिकांप्रमाणे ‘मेट्रो ५’ च्या कारशेडचा प्रश्न रखडला आहे. या मार्गिकेचे काम सुरू असले तरी कारशेड अंधातरी होती. मात्र एमएमआरडीएने अखेर कारशेडची जागा अंतिम केली असून कशेळी येथे कारशेड उभारण्यात येणार होते.  मात्र येथील ग्रामस्थांनी त्यास विरोध केल्याने अखेर सरकारने आता घोडबंदर रोड येथील मोघरपाडा येथील जागा कारशेडसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा
सोनिया गांधीचे मोदींना पत्र, विशेष अधिवेषनात ‘या’ नऊ मुद्यांवर चर्चा करा…
भाजपा नेत्यांच्या कारखान्यांना वाचवण्यासाठी सरकार उदार झाले, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचे चेकमेट 
किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले कमलेश सुतार ?

मुंबई मेट्रो टप्पा-4, 4अ, 10 आणि 11 या मेट्रो मार्गांसाठी मौजे मोघरपाडा येथे सर्वे नं.30 मधील 174.01 हेक्टर क्षेत्र एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येईल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक जमीन संपादनाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मोघरपाडा या ठिकाणच्या 167 भाडेपट्टेधारक शेतकरी आणि 31 अतिक्रमणधारक ग्रामस्थ यांच्यासाठी भरपाईची सुयोग्य योजना एमएमआरडीएने त्यांच्या स्तरावरुन करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हा हा सागरी, नागरी आणि डोंगरी भौगोलिक रचना लाभलेला आहे. मुंबईपासून जवळ असणाऱ्या या जिल्ह्यात अजूनही म्हणाव्या तशा दळण वळणाची साधने नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात मोठी कोंडी होत असते. म्हणूनच की काय मेट्रोचे जाळे ठाण्यात विणायला सुरुवात झाली आहे. ठाण्यापासून मेट्रो भिवंडी, कल्याण धावायला लागल्यावर आपोआप वाहतूक कोंडी कमी होईल.

मंत्रिमंडळ निर्णय कोणते ते जाणून घेऊया
१. मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव (पर्यटन विभाग)
२. राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प (गृह विभाग)
३. आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज (सहकार विभाग)
४. केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट (महसूल विभाग)
५. मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात (महसूल विभाग)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी