30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईखासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस

टीम लय भारी

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मात्र, मला याची काहीही कल्पना नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतो, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी