30 C
Mumbai
Wednesday, September 13, 2023
घरमुंबईऐन गणपतीत फुले महागणार

ऐन गणपतीत फुले महागणार

येत्या १९ सप्टेंबरला गणपतीचे देशभरात आगमन होत आहे. याच दरम्यान संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात होत आहे. राज्यातील बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गणपती काळातच राज्यात पाऊस येत असल्याने फुलांच्या व्यवसायावर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी फुलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी माहिती फुल विक्रेत्यांनी दिली आहे.
 गणपती उत्सवात तेरडा, जास्वंद आणि दुर्वाला जास्त मागणी असते. दादर येथील फुल मार्केट परिसरात गणपती उत्सव वगळता होलसेल दरात फुलांची विक्री होते. कोरोना पासून गणपती उत्सवातील फुलांच्या खरेदीतील होलसेल दरातही वाढ झाली आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाला सामोरे जात आहोत. तुम्ही गणपती वगळता इतर दिवसात फुल मार्केट परिसरात फुले खरेदी करायला या. अल्प दरात फुलांची विक्री करायला आम्ही तयार असतो. सणवरात फुलांच्या खरेदीमध्ये दहा ते वीस रुपयांचा फरक जाणवेल. फुलांची किंमत वाढ रास्त आहे, अशी माहिती दादर येथील फुल विक्रेत्यांनी दिली.
गणपती उत्सवात आमचे कमाईचे दिवस असतात. कित्येकदा एक जास्वंद पाच रुपये किमतीने विकला जातो.परिणामी घाऊक बाजारपेठेत जास्वंदीचे हार विकत घेतल्यास ग्राहकांना शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागतात.
हे ही वाचा 
यंदा पावसाची भीती असल्यानं फुलांच्या व्यवसायात नुकसानीचीही भीती आहे. फुलांच्या किमतीत कितपत वाढवले हे आता सांगता येणार नाही. साधारणतः १७ तारखेपासून फुलांच्या किमतीत वाढ दिसून येईल, असेही फुल विक्रेते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी