28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमुंबईगणरायासाठी थर्माकोलच्या मखरांऐवजी सजावटीसाठी कोणत्या वस्तू बाजारात मिळतायत ?

गणरायासाठी थर्माकोलच्या मखरांऐवजी सजावटीसाठी कोणत्या वस्तू बाजारात मिळतायत ?

येत्या १९ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या गणपतीरायाचं आगमन होत आहे. यंदाच्या आठवड्यापासून बाजारात गणपतीच्या सजावटी पासून ते देखाव्यांसाठी आवश्यक सामानांची भरणी झाली आहे. करून नंतर पहिल्यांदाच भव्य दिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होत असताना सजावटीत थर्माकोलची जागा स्पंज कापसाने घेतल्याचे सकारात्मक चित्र आहे. यंदा सजावटीत पर्यावरण पूरक गणेशोत्सव सामानाला प्राधान्य दिलं गेलंय.

गेल्या शनिवारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुकानदारांनी गणपतीच्या सजावटीचे सामान भरण्यास सुरुवात केली. सोमवारपासून कागदी फुले, तोरण, मण्यांचे हार बाजारात दाखल झाले. यासह गणपती सजावटीतील रंगीबेरंगी दिवे, पणत्या, समईदेखील बाजारात दाखल झाल्या आहेत.

राज्यात प्लास्टिक बंदी साठी पुन्हा तातडीने कडक कारवाया होत आहेत. गणपतीच्या मखरांची मागणी वाढत असताना पर्यावरण पूरक सामान वापरून मखर तयार केले गेले आहेत. थर्माकोलचे मखर बाजारातून दिसेनासे झाले आहे. मात्र छोट्या आकाराच्या स्पंज कापसाच्या सजावटीसाठी दोन हजार रुपयांची किंमत आकारली जात आहे. सणवारात बाजारात आवश्यक किंमतीत वाढ होणे सामान्य आहे. आम्ही जास्त किंमतीने भाववाढ गेल्यावर्षी केली होती. आता फारशी भाववाढ नाहीये असं स्पष्टीकरण कुर्ला स्थानकाबाहेरील दुकानदारांनी दिलं. शनिवारपासून सजावटीचं सामान खरेदी करण्याची लगबग वाढली आहे.

हे सुद्धा वाचा 
दहीहंडीत फुगड्या घालून चार्ज झालेले सोमय्या पुन्हा मैदानात!
अक्षय कुमार करणार एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन आणि दिशा पटानी सोबत धमाल
3 फुटांच्या पुंगनूर गायी पाच किलो चारा खातात आणि देतात पाच लिटर दुध

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. देशभरात गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिण भारतातही गणपती उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीची मूर्ती विकणारी स्टॉल जून महिन्यांपासूनच दिसून येत होते. फॅक्टरीतून गणपती मूर्ती आणल्यानंतर बाजारातील दर्शनीय ठिकाणी स्टॉल उभारणी करून आम्ही मूर्तींच्या जाहिरातीला सुरुवात करतो, असे कुर्ला येथील गणपती विक्रेते सांगतात. दोन वर्षाच्या कोरोनाच्या सावटीनंतर आता गणपतीच्या मोठ्या मूर्तींना मागणी वाढू लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी