33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईमुंबईकरांसाठी गुड न्यूज! पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! पुढील महिन्यापासून ‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’ धावणार

टीम लय भारी 

मुंबई: मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’ मार्ग लवकरच खुला होणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून केवळ मेट्रो रुळांची सुरक्षा चाचणी शिल्लक आहे. या चाचणीनंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.(Good news for Mumbaikars ‘Metro 2A’ and ‘Metro 7’ will run)

करोना, टाळेबंदीसह तांत्रिक अडचणींमुळे या दोन्ही मेट्रो मार्गिकांची कामे वर्षभर रखडली. पण मागील वर्षभरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कामाला वेग दिला आहे. मेट्रोच्या या दोन्ही मार्गिकेसाठी जानेवारीत ‘रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’चे (आरडीएसओ) दर्जाविषयीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

Good news for Mumbaikars 'Metro 2A' and 'Metro 7' will run

काही दिवसांत मार्चमध्ये या दोन्ही मेट्रो सेवा कार्यरत होतील अशी शक्यता आहे. मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’च्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 10 मेट्रो गाडय़ा वापरण्यात येणार आहेत. या गाड्यांची चाचणी मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तर आता या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या गाड्या प्रवासी क्षमतेसह धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबईच्या मेट्रोबद्दल एकनाथ शिंदे यांचा आदेश

नवी मुंबईकर कमी दरामध्ये करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…

ठाणे ते दिवा ‘या’ मार्गासाठी १८ तासांचा ब्लॉक

Mumbai: Metro Line 2A and 7 likely to become operational by March

दुसरीकडे पहिल्या टप्प्यात मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालविण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या आधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणेने आवश्यक त्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असून सेवा देण्यासाठी कर्मचारीवृंद सज्ज झाला आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीत किमान 10 ते 15 टक्क्यांनी घट होईल असे म्हटले जात आहे. त्याशिवाय लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्याचा अंदाज आहे.

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी