29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमुंबईमुंबई व उपनगरात पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता!

मुंबई व उपनगरात पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता!

टीम लय भारी

मुंबई :-  गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत (Mumbai) आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई (Mumbai) आणि उपनगरमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या ४८ तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 

मुंबईतील (Mumbai) प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी ४८ तासांमध्ये मुंबई (Mumbai) व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच, काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच,  येत्या पाच दिवसात मुंबईसह (Mumbai) कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो; छगन भुजबळांचा भाजपला इशारा

कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच योगी विरुद्ध मोदी भाजपाने केलेली खेळी ; नवाब मलिक यांची टीका

भारतीय हवामान विभागाने १३ व १४ जून या कालावधीदरम्यान मुंबई (Mumbai) अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला असल्यामुळे पालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील (Mumbai) समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई (Mumbai) महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पालिकेने नियंत्रण कक्षांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

Mumbai, Bengal Rains LIVE Updates: Thunderstorm, Intense Rain in Palghar, Thane, Raigad, Mumbai in Next 3 Hrs, IMD Says ‘Stay Alert While Going Out’

मुंबईसह (Mumbai) उपनगरात रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. तर, मुंबई (Mumbai) व कोकण किनारपट्टीस अतिवृष्टीचा देखील इशारा दिलेला आहे. आज सकाळपासून मुंबईत (Mumbai) अंधेरी, दादर, सायन, कुर्ला, परळ या ठिकाणांसह पश्चिम उपनगरात पाऊस सुरू आहे. अनेक भागांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पूर्व मोसमी सरींना असलेला जोर, नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच मुंबईत (Mumbai) दाखल झालेला मोसमी पाऊस, या कारणांमुळे मुंबईत (Mumbai) यावर्षी पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या १० दिवसांतच ओलांडली. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई (Mumbai) उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी ५०५ मिलीमीटर आहे; मात्र यंदा १ ते ११ जून, सकाळी ८.३० वाजेपर्यंत उपनगरात ५३४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी