28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईपवईत महामानवाच्या जयंती निमित्त पवईतील कोरोना योध्दांचा सन्मान

पवईत महामानवाच्या जयंती निमित्त पवईतील कोरोना योध्दांचा सन्मान

टीम लय भारी

पवई :- महाराष्ट्रात कोरोना विषाणुमुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. दरदिवशी वेगवेगळा कोरोना रुग्ण वाढीचा आकडेवारी समोर येत आहे त्यातच सर्वत्र सरकारी आदेशानुसार जमावबंदी व १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून महाराष्ट्रात १४४ संचारबंदी घोषित करण्यात येणार आहे.

सर्व काही लक्षात घेत पवईत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती पुर्णतः सरकारी आदेशानुसार सोशल डिस्टंसिंगचे पालन करून तोंडाला मास्क लावत यंदा या कोरोना महामारीत जनतेला सेवा देणाऱ्या कोरोना योध्दांचा पवईतील वार्ड क्रमांक १२२ च्या रिपाइं (आठवले) गटाच्या वतीने विभागातील डॉक्टर, मेडिकल चालक,पत्रकार, समाजसेवक अशा इत्यादींना कोरोना योध्दा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त सन्मानित करण्यात आले.

कोरोना योध्दा म्हणून डॉ. एस.आर.मिश्रा, डॉ. विनोद पांडे, डॉ हेमंत घोडके याच प्रमाणे आदी समाजसेवकांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोना काळात हातावरचे पोट असलेल्या जेवीआर रोड लगत असलेल्या गोर-गरीबांना राहुल गच्चे यांच्या पुढाकाराने अन्नाचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी