30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईलोकशाही चॅनल 72 तास बंद ठेवण्याचे आदेश

लोकशाही चॅनल 72 तास बंद ठेवण्याचे आदेश

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका कथित व्हिडीओचे प्रसारण केल्याप्रकरणी लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नोटीस बजावत पुढील 72 तास चॅनल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत कमलेश सुतार यांनी समाज माध्यमात माहिती दिली आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच्या काळात लोकशाही चॅनलने किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ प्रसारित केला होता. या प्रकरणी विधिमंडळात देखील व्हिडीओवरुन गदारोळ झाला होता. त्यानंतर लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांची चौकशी केली होती. तसेच काही तास चॅनल बंद देखील होते. त्यानंतर मागील काही दिवसांपूर्वी चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हे सुद्धा वाचा 
भाजप खासदार रमेश बिधूडींनी संसदेत मुस्लीम खासदाराला घातल्या शिव्या; राहूल गांधी दानिश अलींच्या भेटीला
भारत – ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडेमध्ये शमीचा जलवा, ऑसींसमोर केला नवा विक्रम
मंत्रालयात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा

दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चॅनलला नोटीस पाठविली होती. कमलेश सुतार म्हणाले या नोटीसीला उत्तर देण्यात आले होते. त्यातच आज पुढील 72 तास चॅनल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी (दि.21) रोजी सायंकाळी 7 वाजलेपासून चॅनलचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. सुतार म्हणाले, आम्ही सुचनांचे पालन करुच पण आमचे म्हणणे ऐकुन घेण्याची आमची अपेक्षा होती. तसेच अद्याप या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतू आम्हाला थेट शिक्षाच सुनावल्याचा हा प्रकार आहे. आम्ही कायदेशी लढाई लढणार असल्याचे सुतार यांनी म्हटले आहे.

दरम्यान अजित पवार गटाचे विधान परिषद आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी एक्स (ट्विटर)वर निषेध व्यक्त केला आहे, ते म्हणाले, लोकशाही मराठी चॅनल 72 तासांकरीता अचानक बंद केले जाणे ही लोकशाहीची पायमल्ली आहे. लोकशाही मराठी चॅनल ने आतापर्यंत नेहमी सामान्य जनतेचा विषय मांडला आहे. लोकशाही मराठी चॅनल विरुद्ध सुड भावनेतुन केलेल्या कारवाईचा मी निषेध व्यक्त करतो.

तर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील एक्स (ट्विटर) वर प्रतिक्रीया दिली आहे. लोकशाही वृत्तवाहिनीवर करण्यात आलेली प्रक्षेपणबंदीची कारवाई अत्यंत चुकीची आहे. मदर ऑफ डेमॉक्रसी असलेल्या भारतात माध्यमांनी केलेल्या वृत्तांकनाचा फटका सत्ताधारी पक्षाला बसला म्हणून माध्यमांवर बंधने आणणे चुकीचे आहे. या कारवाईचा मी निषेध करते, असे आमदार ठाकूर यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी