33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराष्ट्रीयभाजप खासदार रमेश बिधूडींनी संसदेत मुस्लीम खासदाराला घातल्या शिव्या; राहूल गांधी दानिश...

भाजप खासदार रमेश बिधूडींनी संसदेत मुस्लीम खासदाराला घातल्या शिव्या; राहूल गांधी दानिश अलींच्या भेटीला

संसदेचे विशेष अधिवेशन सुरु असून ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि.21) रोजी चांद्रयान मोहीमेवर चर्चे दरम्यान भाजपचे दिल्लीचे खासदार रमेश बिधूडी यांनी बहुजन समाज पक्षाचे अमरोहाचे खासदार कुंवर दानिश अली यांच्याबद्दल असभ्य भाषेचा वापर केला. तसेच त्यांना शिव्या देखील घातल्या. दरम्यान संसदेच्या पटलावरुन त्यांनी उच्चारलेले असभ्य शब्द हटविण्यात आले आहेत.

रमेश बिधुडी संसदेत बोलत असताना लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर कोडीकुन्नील सुरेश विराजमान होते. त्यांनी बिधुडी यांना खाली बसण्यास सांगितले, मात्र ते खाली बसले नाहीत. त्यांनी आपल्या भाषणात असभ्य भाषा वापरली. त्यानंतर त्यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

दरम्यान बिधुडी यांच्या भाषणावर जोरदार टीका झाली. त्यानंतर सभागृहात अशी भाषा वापरल्यास कठोर कारवाई करु असा इशारा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने देखील बिधुडी यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. दरम्यान बिधुडी यांच्या वर्तनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खेद व्यक्त केला. तर काँग्रेसने बिधुडी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा 
भारत – ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडेमध्ये शमीचा जलवा, ऑसींसमोर केला नवा विक्रम
मंत्रालयात शुकशुकाट, कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा
शरद पवार, वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड एकाच स्टेजवर येणार

तर खासदार दानिश अली म्हणाले, मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याची मागणी केली आहे. माझ्यासारख्या निवडून आलेल्या सदस्याची अवस्था असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल? मला न्याय मिळेल अशी आशा आहे. याप्रकऱणाची सभापती चौकशी करतील, अन्यथा मी संसद सोडेन कारण हे माझ्या सहनशिलतेपलिकडचे आहे.

खासदार दानिश अली यांच्याबाबत घडलेल्या प्रकारानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दानिश अली यांच्या निवसास्थानी जावून भेट घेतली. काल (दि.21) रोजी संसदेत रमेश बिधूडी यांनी दानिश अली यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले होते. बिधुडी यांनी असंसदीय शब्दांचा वापर केला होता आणि भाजपचे दोन माजी मंत्री त्यावर हसत होते. बिधुडी यांचे कृत्य अंत्यत लज्जास्पद असून संसदेच्या प्रतिष्ठेला कलंक आहे. काँग्रेस देशासह लोकशाहिच्या मंदिरात अशा द्वेषाच्या मानसिकतेच्या विरोधात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी