27 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रसोलापूर शहरात हातभट्टी दारूला लगाम! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठिकठिकाणी धाडसत्र..

सोलापूर शहरात हातभट्टी दारूला लगाम! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठिकठिकाणी धाडसत्र..

सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाडीची मोहीम राबवत शुक्रवारी, (22 सप्टेंबर) हातभट्टी दारू उत्पादनाच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हात भट्टी दारू विरोधात सातत्याने मोहीम राबवण्यात येत असून मोटरसायकलीवरून वाहतूक होणारी 320 लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली असून जिल्ह्यातील अनधिकृत दारू विक्रीस यामुळे आळा बसणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कामगिरीने सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हातभट्टी दारू विरोधात शुक्रवारी शहरातील राघवेंद्र नगर येथे हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई केली. सादर इसमाचे नाव गणपत पवार असून तो गणपत तांडा येथे राहणार आहे. तब्बल 320 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक त्याच्या मोटरसायकलवरून करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय, एका अन्य कारवाईत भरारी पथकाने 240 लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे. शहरातील साईबाबा चौक येथे विकास राठोड नामक इसमाच्या ताब्यातून 12,300 रुपये किमतीची 240 लिटर हातभट्टी दारु जप्त करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादर इसमाणे दारूची साठवणूक तीन रबरी ट्यूबमध्ये केली होती.

राज्य उत्पादन शुल्क अ विभाग , ब विभाग व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी शुक्रवारी केलेल्या अजून एक कारवाईत शहरातील घोडा तांडा व भोजप्पा तांडा येथील हातभट्टी दारू अड्यांवर छापे टाकून 240 लिटर हातभट्टी दारू व 6,350 लिटर गुळ मिश्रित रसायन असा 1,55,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान घोडा तांडा येथील जया भारत राठोड या महिलेच्या ताब्यातून पाच प्लास्टिक बॅरल मध्ये साठवून ठेवलेले एक हजार लिटर रसायन व तुळसाबाई मोतीराम राठोड, या महिलेच्या ताब्यातून तीन रबरी ट्यूब मधील 240 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. भोजप्पा तांडा येथे टाकलेल्या धाडीत 2,900 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून दोन आरोपी फरारआहेत. या आरोपींचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा 

राजेशाही थाटाची डेक्कन ओडिसी तीन वर्षानंतर पुन्हा धावली!

आणि पाकिस्तानी कवियत्री रेहाना रुही यांची गझल लोकसभेत गाजली

लोकशाही चॅनल 72 तास बंद ठेवण्याचे आदेश

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर, सदानंद मस्करे , दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे, उषाकिरण मिसाळ, मानसी वाघ , रोहिणी गुरव , सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख , गजानन होळकर, मुकेश चव्हाण, जवान किरण खंदारे, चेतन व्हनगुंटी , इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे, योगीराज तोग्गी, आनंदराव दशवंत, प्रशांत इंगोले, वाहनचालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी ही कारवाई पार पाडली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी