27 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमुंबईदोन्ही सभागृहात हॉटलाईन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक- निलम गोऱ्हे

दोन्ही सभागृहात हॉटलाईन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक- निलम गोऱ्हे

विधिमंडळातील  विधानसभा आणि विधान परिषद ही दोन्ही सभागृहे समान असावीत असे आम्हाला वाटते. या दोन्ही सभागृहात काय काम चालू आहे याची तातडीची माहिती मिळण्यासाठी हॉटलाईन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. आपण जे सभागृहात वर्तन करतो त्याकडे समाजाचे लक्ष असते. घरेलू कामगार संरक्षण कायदा सभागृहात पारित होत असताना रात्री बारा वाजता त्यावर बोलले होते. सकाळी काही महिलांनी तुमचे भाषण चांगले झाले असे सांगितले. त्यामुळे आपण सभागृहात काय बोलतो, याकडे जनतेचे लक्ष असते, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी बुधवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सव समारंभात (Maharashtra Legislative Council Centenary Festival) व्यक्त केले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सव कार्यक्रमात विधान परिषदेच्या विद्यमान आणि माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आणि परिसंवाद यावेळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गोऱ्हे बोलत होत्या. राज्याच्या विधान परिषदेला एक इतिहास आहे. विधान परिषदेच्या अनेक सभापतींनी सभागृह कसे चालवले पाहिजे याचा आदर्श निर्माण केला होता. रोजगार हमी कायदा, गर्भजल चिकित्सा चाचणी, प्रकल्प पुनर्वसन कायदा, मोक्का, डान्सबंदी कायदा,घरेलू कामगार संरक्षण कायदा असे अनेक कायदे राज्याच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले.

नंतर केंद्रानेही त्याच धर्तीवर कायदे केले. ही राज्यासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. विधानसभा आणि विधान परिषदेत समन्वय आवश्यक असतो. दोन्ही सभागृह समान असावे असे वाटते. त्यामुळेच की काय दोन्ही सभागृहात काय काम चालले याची माहिती मिळावी यासाठी हॉटलाईन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे, असेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा 

बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस कधी? आदित्य ठाकरेंचा महापालिका आयुक्तांना प्रश्न
राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जाणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली गोड बातमी!
दिवाळीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

पुरवण्या मागण्या, प्रस्ताव यामुळे अनेक सदस्यांना सभागृहात बोलत येत नाही. पण अनेकदा अनेकांना बोलायला दिले आणि त्यांनी राज्यातील महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली.

विधानसभेचा दर्जा घसरू लागला आहे-माजी आमदार श्रीकांत जोशी
गेल्या काही वर्षात विधान सभेच्या दर्जा घसरू लागला आहे. त्यामुळे विधान परिषदेची आवश्यकता आहे., असे मत माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. विधान सभेच्या आमदाराला मतदारांचे हिशोब करावे लागतात. ते आपल्या मतदार संघाच्या बाहेर विचार करू शकत नाही.

विधिमंडळाकडे आपण कल्याणकारी राज्य म्हणून पाहतो. विचार करतो. विधान परिषदेला व्हिजनरी संकट कळते.
विधानसभेत सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता, विधिमंडळाची परिणामकारकता कमी होत आहे. पाणी, हवा, वातावरणीय बदल, शिक्षण, ऊर्जा यावर येत्या काळात विधान परिषदेने काम केले पाहिजे, असेही जोशी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी