32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयसुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला दम

सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला दम

दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी (Babasaheb Purandare) त्यांच्या एका पुस्तकात कुणबी समाजाचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी कुणबी समाजाबाबात केलेल्या वक्तव्यावर बोलत असताना मला सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) अडवले असा दावा केला आहे. यावरून राजकारणाला एक वेगळेच वळण लागले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी संवाद साधला आहे. पुरंदरेंनी कुणबी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी शुद्र असल्याने माझ्यावर टीका केली जाते, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत. मात्र राजकीय पक्षात जे पद कोणाला मिळाले नाही, ते पद फक्त तुमच्या घराला दिले आहे. जयंत पाटील, मिनाक्षी पाटील हे शरद पवारांना वडील मानतात. तरीही आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिले आहे. त्यानंतर त्यांनी मला मागे ठेवत आदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्री पद दिले असून त्यावेळी मी शुद्र होतोच, असे वक्तव्य आव्हाडांनी केले आहे.

हे ही वाचा

राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जाणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली गोड बातमी!

‘चकली’वरून शीतल म्हात्रे-किशोरी पेडणेकरांमध्ये दिवाळीपूर्वीच टीकेची सुरसूरी

दिवाळीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

‘चार आण्याला पाच कुणबी मिळत’

बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या पुस्तकात कुणबी समाजाबाबत अतिशय घाणेरडे वक्तव्य केल्याचा आव्हडांचा दावा आहे. ‘चार आण्याला बारा कुणबी मिळत असे’ हे वक्तव्य बाबासाहेब पुरंदरेंनी केले असून या विरोधात मी आवाज उठवत असताना मला सुनील तटकरेंनी दम दिला पक्षात असे चालणार नाही, बाबासाहेब पुरंदरेंची माफी मागा असे वक्तव्य केले होते. मी तेव्हाच सांगितले होते की, माझा अभ्यास आहे. मी मागे हटणार नाही. मात्र तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंविरोधात बोलला नाहीत, अशी शाब्दिक फटकेबाजी करत आव्हाडांनी सुनील तटकरेंवर पलटवार केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी