30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबई'स्वस्त दरात ना नफा, ना तोटा' मनसेचा उपक्रम सर्वत्र चर्चेत

‘स्वस्त दरात ना नफा, ना तोटा’ मनसेचा उपक्रम सर्वत्र चर्चेत

महागाईमुळे सामन्यांचे आणि मराठी माणसांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. सत्ताधारी हे नागरिकांचे दिवाळी सणात दिवाळे काढायला बसले आहे. काही पक्ष सत्तेत असले तरीही काम करत नाहीत, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव मराठी लोकांच्या न्याय हक्कासाठी पाठिशी असते. मराठी, हिंदू सण साजरे व्हावेत यासाठी सदैव तत्पर असते. हिंदू सण, मराठी अस्मिता आणि मराठी बाणा लक्षात ठेऊन नवी मुंबईतील नेरूळ आणि जुईनगर विभागात मनसेने एक उपक्रम राबवला आहे. याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

‘स्वस्त दरात ना नफा, ना तोटा’ या उपक्रमातून मनसे दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य अगदी कमी किंमतीत देत आहे. म्हणूनच या उपक्रमाचा स्वस्त दरात ना नफा ना तोटा असा उल्लेख केला आहे. हा उपक्रम नवी मंबईतील नेरूळ आणि जुईनगर विभागात सुरू होता. गेली ४ वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. यंदाही या उपक्रमाचे आयोजन केले असून नेरूळ आणि जुईनगर विभागाचे मनसे शहर सचिव अभिजीत देसाई आणि अनुष्का देसाई यांनी दरवर्षी प्रमाणे यंदा दिवाळी निमित्त फराळासाठी लागणारे साहित्य उपक्रमाच्या माध्यामातून विक्री केली. या उपक्रमासाठी यंदाही नेरूळकर आणि जईनगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर आता मनसे प्रतिनिधी अनुष्का देसाईंनी उपक्रमाबाबत माहिती दिली आहे.

'स्वस्त दरात ना नफा, ना तोटा' मनसेचा उपक्रम सर्वत्र चर्चेत

 

हे ही वाचा

इस्रायली सैन्याच्या गाझातील निर्वासित शिबिरावरील हल्ल्यात 33 ठार

मराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच

दिवाळीआधी भारताची दिवाळी; जीएसटीतून मिळाले 1.72 लाख कोटी

काय म्हणाल्या अनुष्का देसाई

उपक्रमाची सांगता मनसे शहर अध्यक्ष आणि पक्ष प्रवक्ते ग़ज़ानन काळे यानी केली,या उपक्रमात गेल्या ४ दिवसात तब्बल साखर-३२०० किलो, रवा-१२५० किलो, मैदा-१४०० , सनफ्लावर तेल- ३००० लीटर , डालडा-४५० किलो, गूळ-१३५०किलो एवढ्या मोठया प्रमाणात वस्तूंची यशस्वी विक्री करून नेरूळ-जुईनगर विभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असल्याने यापुढेही नेहमीच असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करत राहू असे मनसे प्रतिनिधी अनुष्का देसाई यांनी सांगितले.

वस्तुंची मूळ किंमत आणि उपक्रमाच्या माध्यमातून राबवलेली किंमत

४० रुपयांना असणारा मैदा ३३ रूपयांची विक्री किंमत होती. रव्याची किंमत ४० रुपसये होती तर या माध्यामातून रवा हा ३३ रुपयांना विकला गेला आहे. ७५ रुयांचा गुळ ५५ रुपयांना विकला आहे. ४५ रुपयांची साखर ही ४० रुपयांना विकली गेली. १२० रुपये मूळ किंमतीचा डालडा १०० रुपयांना विकला आहे. १४० रुपयांचे सनफ्लॉवर तेल ९५ रुपयांना विकले गेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी