32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईखासदारांनो राजीनामा द्या; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

खासदारांनो राजीनामा द्या; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जोरात सुरू असताना महाराष्ट्र राज्यासाठी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता, हा आदर्श घेऊन राज्यातील खासदार असलेल्या मंत्र्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा विषय घ्यावा. पंतप्रधान यासाठी तयार नसतील तर राज्यातल्या सगळ्याच खासदारांनी राजीनामा द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेतील खासदारांनी राज्यात राजीनामे देऊन उपयोग नाही, असेही ते म्हणाले. ‘महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे.

राज्यात दोन दिवसापासून मराठा आंदोलन आक्रमक बनत आहे. मराठवाड्यात दोन आजी आमदार आणि एका माजी आमदाराचे घर पेटवून देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी भवन पेटवून टाकले. अनेक सरकारी वाहनांना लक्ष्य करण्यात आले आहे. आमदार आणि खासदार मंडळींनी राजीनामे दिले आहेत. बीड आणि धारशिव जिल्ह्यात संचारबंदी आहे. एकुणात राज्यात मराठा आंदोलन तेजीत सुरू आहे. असे असताना, सरकारला हे आंदोलन व्यवस्थित हाताळण्यात आले नाही. अशी टीका विरोधक करत आहे. या सगळ्या घडामोडीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाबाबत भूमिका सांगितली.

मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढे करून देखील पंतप्रधानवर परिणाम होणार नसेल तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा 

‘विशेष अधिवेशन घ्या,’ जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मराठा आरक्षण आंदोलन का पेटलं? मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक
बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर, भुजबळांच्या कार्यकर्त्याचे हॉटेल पेटवले

सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, पुण्यामध्ये बस सेवा बंद 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सोमवारी अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 160  बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी