26 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeक्रिकेटवर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीवर धोनीचे सूचक विधान

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीवर धोनीचे सूचक विधान

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. सर्वच संघ आपापल्या परीने चांगली कामगिरी करत आहेत. अनेकांना भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल सामना होईल, असे वाटले होते. मात्र पाकिस्तान संघाची पिछेहाट झाली. प्रत्येक संघाने हार पत्करली असून टीम इंडियाचा अपवाद आहे. प्रत्येक सामना हा अटीतटीचा होत असून भारताने 6 पैकी 6 सामने जिंकून एकही हार पत्करली नाही. (29 ऑक्टोबर) दिवशी झालेला भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात भारताला 229 धावांवर बाद केले. तर भारतासमोर केवळ 129 धावात इंग्लंड हा संघ गारद झाला. भारताने 6 सामन्यात एक हाती विजयी मिळवला. यावर आता भारतीय संघाचा माजी खेळाडू महेंद्र सिंग धोनीने भारतीय संघाबाबत सुचक विधान केले आहे.

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघाबाबत आपले मत व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्यानुसार भारताने सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये आपली जागा सेमीफायनलमध्ये पक्की केली आहे. भारत वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकेल, अशी चर्चा सर्वत्र आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या सामन्यावेळी अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघाबद्दल वक्तव्य केले. मात्र भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंग धोनी चिडीचूप होता. मात्र आता त्यानेही मौन सोडले आहे. भारताची खेळी आणि कर्णधार रोहित शर्माबाबत त्यांनी गौप्यस्फोट करत वक्तव्य केले आहे.

हे ही वाचा

‘विशेष अधिवेशन घ्या,’ जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुकेश अंबानींच्या जीवावर कोण उठलंय?

मराठा आरक्षण आंदोलन का पेटलं? मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

काय म्हणाला धोनी?

भारताची परिस्थिती ही चांगली आहे. भारताचे सर्वच खेळाडू तंदुरुस्त असून चांगली कामगिरी करत आहेत. आताची परिस्थिती पाहता सर्व काही चांगले होताना दिसत आहे. भारताच्या वर्ल्डकप विजयावर त्याने, ‘समजणाऱ्याला इशारा’ असे उत्तर देत धोनीने आपले मत व्यक्त केले आहे. अर्थात कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघ कमालीची कामगिरी करत आहे.

धोनी हा देखील अष्टपैलू खेळाडू असून त्याच्या कारकीर्दीत त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने अनेक सामने, मालिका,तर विश्वचषकही भारतीय संघाला जिंकून दिला आहे. धोनीने आपल्या कामगिरीत 2011 चा वर्ल्डकप, 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी, 2007 मधील T-20 वर्ल्डकप देखील जिंकून दिला आहे.

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी