35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईMukesh Ambani: केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेश अंबानींच्या सुरक्षेत केली वाढ; मिळाली झेड प्लस...

Mukesh Ambani: केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेश अंबानींच्या सुरक्षेत केली वाढ; मिळाली झेड प्लस दर्जाची सुरक्षा

गेल्या वर्षी अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानाबाहेर बॉम्बच्या मिळाल्याच्या अफवेनंतर केंद्रातील गृहमंत्रालय देशातील आघाडीच्या उद्योगपतींची सुरक्षा मजबूत करण्यावर ‍विचार-विनिमय करत होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मुकेश अंबानीच्या जीवाला धोका असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांना मिळाली होती. त्या अहवालाच्या आधारे अंबानींचे सुरक्षा कवच ‘Z+’ श्रेणीपर्यंत वाढविण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना यापूर्वी ‘झेड श्रेणी’ ची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. गेल्या वर्षी अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानाबाहेर बॉम्बच्या मिळाल्याच्या अफवेनंतर केंद्रातील गृहमंत्रालय  देशातील आघाडीच्या उद्योगपतींची सुरक्षा मजबूत करण्यावर ‍विचार-विनिमय करत होते.

सुरक्षा कवच कसे दिले जाते?

भारतात,  एखादया व्यक्तीच्या कामामुळे किंवा लोकप्रियतेमुळे जर त्यांचे जीवन धोक्यात आले आहे तर अशा मान्यवर व्यक्तींना सुरक्षा कवच दिले जाते. समाजकंटक शक्तींपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना विविध प्रकारच्या सुरक्षा पुरवल्या जातात. धोक्यांचे मूल्यांकन केल्यानंतर  सुरक्षा श्रेणी पाच गटांमध्ये विभागली जाते आणि त्या व्यक्तीला योग्य ती सुरक्षा पुरविण्यात येते. X, Y, Z, Z+, SPG अशा प्रकारांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेचे वर्गीकरण केलेले आहे.  साधारणत: अशी सुरक्षा VIP आणि VVIP, क्रीडापटू, मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती आणि इतर हाय-प्रोफाइल किंवा राजकीय व्यक्तींना उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा –

Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने अविवाहीत महिलांचा गर्भपात व वैवाहीक बलात्कार यावर दिला ऐतिहासिक निर्णय

Team India : जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर, मोठी बातमी आली समोर

Vegetable Rate : ऐन सणासुदीत भाजीपाल्याचे दर वाढले, किंमत ऐकून व्हाल थक्क

झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय?

झेड प्लस ही सुरक्षा संरक्षणाची दुसरी-उच्च पातळी आहे. या सुरक्षा कवचामध्ये एकूण 55 सुरक्षा रक्षक नेमलेले असतात. ज्यामध्ये 10 पेक्षा जास्त NSG कमांडो आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश होतो. या सुरक्षा कवचातील प्रत्येक कमांडोने मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाई करण्याचे प्रशिक्षण घेतलेले असते.

सध्या हे सुरक्षा संरक्षण भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय अर्थमंत्री आणि इतर मान्यवरांना देण्यात आले आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी