28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रVegetable Rate : ऐन सणासुदीत भाजीपाल्याचे दर वाढले, किंमत ऐकून व्हाल थक्क

Vegetable Rate : ऐन सणासुदीत भाजीपाल्याचे दर वाढले, किंमत ऐकून व्हाल थक्क

मागच्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर या आठवड्यात पावसाची संततधार यामुळे पालेभाज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालेभाज्यांचे पीक वाया गेल्याने परिणामी पालेभाज्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

राज्यात पाऊस काहीशी हुलकावणी देत असला तरीही जोर मात्र कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस थोडा लांबला असल्याने त्याचा थेट फटका पालेभाज्यांना बसला आहे. अशातच सणसमारंभाचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे अनेकांनी आपली गाडी व्हेज खाण्याकडे वळवली आहे, परंतु भाज्यांचे चढते भाव ऐकून अनेकांची निराशा झाली आहे. आता नेमकं खायचे काय असा प्रश्नच त्यांना पडला आहे. दरम्यान, सगळ्यांच भाज्यांत वापरली जाणारी कोथिंबीर कमालीची महागली आहे. कोथिंबीरने तर आता नवा उच्चांंक गाठल्याचे पाहायला मिळत आहे, चक्क एक जुडी तब्बल 200 रुपयांना विकली जात आहे. भाज्यांच्या या चढ्या भावांमुळे सणासुदींच्या काळात सुद्धा सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

पावसाचा जोर राज्यात कमी झाला असला तरीही त्याचा फटका पालेभाजी उत्पादक पर्यायाने ग्राहकांना बसत आहे. सप्टेंबर संपून ऑक्टोबरची चाहूल लागली असली तरी पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. मागच्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर या आठवड्यात पावसाची संततधार यामुळे पालेभाज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पालेभाज्यांचे पीक वाया गेल्याने परिणामी पालेभाज्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा…

Six Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

Team India : जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर, मोठी बातमी आली समोर

JIO New Offer : जिओच्या नव्या ऑफरमुळे ग्राहक आनंदी, आता वापरायला मिळणार 112GB डेटा

सगळ्या भाजांमध्ये वापरली जाणारी कोथिंबीरचे भाव सुद्धा यावेळी गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाले. सध्या एक कोथिंबीर जुडी घ्यायची असल्यास ग्राहकांना 200 रुपये मोजावे लागणार आहेत. कोथिंबीरची आवक कमी झाल्याने सध्या शेतकऱ्याला चांगला दर मिळत आहे, तर सर्वसामान्यांच्या खिशाचे भोक मोठे होत चालले आहे. इतर शेतमालाची सुद्दा आवक घटल्याने इतर भाजी पाल्यांचे दर कडाडल्याचे पाहायला मिळत आहेत.

पालेभाज्यांच्या नेहमीच्या आवकेच्या तुलनेत 50 ते 60 टक्केच आवक होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे काही पालेभाज्या तर मिळेनाशा झालेल्या आहेत, तर ज्या उपलब्ध आहेत त्यांचे दर दुप्पट, तिप्पटीने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पालेभाजी प्रमाणेच तुम्ही कोणतीही फळभाजी सुद्दा भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेलात तर कोणत्याही भाजीचे दर 20 ते 30 रुपये पावशेर पासून सुरू होतात आणि 140 ते 160 अशा किंमतीत किलोपर्यंत जातात.

पालेभाज्यांप्रमाणे फळभाज्या सुद्धा महाग झाल्याने रोजच्या डब्यासाठी नेमकं बनवायचे तरी काय असा प्रश्नच गृहिणींना सतावू लागला आहे. अशातच आता नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. संपुर्ण नऊ दिवस केवळ आणि केवळ शाकाहारी राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळते परंतु भाज्यांच्या वाढच्या दरांनी नाकात एवढा दम केला तर नेमकं खायचं काय नुसती कडधान्ये किती दिवस खायची असा प्रश्न सारखा भंडावून सोडवू लागला आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी