30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
HomeराजकीयCongress President Election: माझ्यात आणि दिग्विजय सिंह यांच्या मध्ये मित्रत्वाची लढाई होईल...

Congress President Election: माझ्यात आणि दिग्विजय सिंह यांच्या मध्ये मित्रत्वाची लढाई होईल – शशी थरूर

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणारे शशी थरूर हे पहिले उमेदवार होते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेसपक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी स्वत:ची उमेदवारी दाखल करण्यापूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते व मध्यप्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी नवी दिल्लीत तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांची भेट घेतली. सिंह यांची भेटी घेतल्यानंतर शशी थरूर म्हणाले की, आम्ही दोघांनी मान्य केले की आमची ही प्रतिस्पर्ध्यांमधील लढाई नाही तर सहकाऱ्यांमधील मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे.

या सदिच्छा भेटीनंतर थरूर यांनी आपल्या ट्विटरवर अंकाउटवर स्वत:चे व दिग्विजय सिंह यांचे छायाचित्र टाकले व लिहिले, “आज दुपारी @digvijaya_28 यांनी माझी भेट घेतली. मी आमच्या पक्षाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करतो. आम्ही दोघांनी मान्य केले की आमची ही प्रतिस्पर्ध्यांमधील लढाई नाही तर सहकाऱ्यांमधील मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. आम्हा दोघांना असे वाटते की जो ही निवडणूक जिंकेल तो काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करेल.”

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणारे शशी थरूर हे पहिले उमेदवार होते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हे सुद्धा वाचा –

Mukesh Ambani: केंद्रीय गृहमंत्रालयाने मुकेश अंबानींच्या सुरक्षेत केली वाढ; मिळाली झेड प्लस दर्जाची सुरक्षा

Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने अविवाहीत महिलांचा गर्भपात व वैवाहीक बलात्कार यावर दिला ऐतिहासिक निर्णय

Vegetable Rate : ऐन सणासुदीत भाजीपाल्याचे दर वाढले, किंमत ऐकून व्हाल थक्क

तब्ब्ल दोन दशकांनंतर काँग्रेस पक्षप्रमुखपदासाठी लढत होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवाराच्या अर्जाच्या छाननीची तारीख १ ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. १७ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष निवडणूक होईल. 19 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाईल.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी